महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Dream girl 2 collection day 13 : 'ड्रीम गर्ल 2' रिलीजच्या तेराव्या दिवशी करू शकतो 'इतकी' कमाई... - बॉक्स ऑफिस कलेक्शन

Dream girl 2 collection day 13 : बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट रुपेरी पडद्यावर चांगली कामगिरी करत आहे. हा चित्रपट लवकरच 100 कोटीच्या क्लबमध्ये दाखल होण्याच्या मार्गावर आहे.

Dream girl 2 collection day 13
ड्रीम गर्ल 2 कलेक्शन दिवस 13

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 3:12 PM IST

मुंबई Dream girl 2 collection day 13 : बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल 2' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुरानाने दमदार अभिनय करून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 10 कोटी 69 लाखांचा व्यवसाय केला होता. 'ड्रीम गर्ल 2'मध्ये पूजाने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या हृदयाची घंटा वाजवली आहे. हा चित्रपट एकता कपूरच्या बालाजी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार केलेला असून प्रेक्षकांची या चित्रपटाला खूप चांगली दाद मिळत आहे. दरम्यान आता 'जवान' रुपेरी पडद्यावर दाखल होण्यासाठी 1 दिवस उरला आहे. त्यामुळे या चित्रपटाला कमाई करण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत.

'ड्रीम गर्ल 2'ची एकूण कमाई :आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं रिलीजच्या बाराव्या दिवशी 3.04 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 91.96 कोटी झालं आहे. हा चित्रपट तेराव्या दिवशी 2.45 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 94.45 कोटी होईल. या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांच्या व्यतिरिक्त परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, अभिषेक बॅनर्जी, अन्नू कपूर यांनी महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. 'ड्रीम गर्ल 2' ने पहिल्या आठवड्यात 67 कोटीची कमाई केली होती.

'ड्रीम गर्ल 2'ची कमाई

  • पहिला दिवस 10.69 कोटी
  • दुसरा दिवस 14.02 कोटी
  • तिसरा दिवस 16 कोटी
  • चौथा दिवस 5.42 कोटी पा
  • पाचवा दिवस 5.87 कोटी
  • सहावा दिवस 7.5 कोटी
  • सातवा दिवस 7.5 कोटी
  • आठवडा 1 कलेक्शन 67 कोटी
  • आठवा दिवस 4.7 कोटी
  • नव्वा दिवस 6.36 कोटी
  • दहावा दिवस 8.1 कोटी
  • अकरावा दिवस 2.8 कोटी
  • बारावा दिवस 3.04 कोटी
  • तेरावा दिवस 2.45 कोटी कमई होऊ शकते

'ड्रीम गर्ल 2'ची एकूण कलेक्शन 94.45 कोटी

हेही वाचा :

  1. Dream girl 2 box office collection 12 : आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट 12व्या दिवशी करू शकतो 'इतकी' कमाई...
  2. Vicky Kaushal And Katrina Kaif : कतरिना-विक्कीच्या नात्यात कसा आला लग्नाचा ट्विस्ट, वाचा कसा फुलला नात्याचा गुलाब...
  3. Vijay Deverakonda : विजय देवरकोंडा आपल्या 'खुशी'च्या कमाईतील 1 कोटी रुपये करणार दान...

ABOUT THE AUTHOR

...view details