मुंबई - Dono box office collection day 1 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओलनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. राजवीरनं 'दोनो' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटातून पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा हिने देखील राजवीरसोबत डेब्यू केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक सूरज बडजात्याचा मुलगा अवनीश बडजात्यानं केलं आहे. हा चित्रपट 5 ऑक्टोबर 2023 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये प्रेमकहाणी दाखविण्यात आली आहे. 'दोनो' चित्रपटाला संगीत हे शंकर-एहसान-लॉय यांनी दिले आहे. याशिवाय या चित्रपटामधील गाणी ही इर्शाद कामिल यांनी लिहिली आहेत.
'दोनो'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन :अभिनेता राजवीर देओलचा जादू हा प्रेक्षकांवर कमाल करू शकला नाही. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 35 लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर 'दोनो' चित्रपटानं दुसऱ्या दिवशी जवळपास 60 लाखांची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 1 कोटीच्या जवळपास झालं आहे. या चित्रपटाकडून देओल कुटुंबाला खूप अपेक्षा आहे. 'दोनो' चित्रपटाला देशांतर्गत फक्त 273 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. राजश्री प्रॉडक्शनच्या या चित्रपटाने अंदाजे 8 कोटी रिलीजपूर्वी कमाई केली आहे. 'दोनो' चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क 50 लाख रुपयांना विकले गेले आहेत. याशिवाय डिजिटल हक्क 3 कोटी रुपयांना आणि संगीत हक्क 1 कोटी 30 लाख रुपयांना विकले गेले. यानुसार 'दोनो'नं डिजिटल सॅटेलाइट आणि संगीत हक्क विकून एकूण 8 कोटी 80 लाख रुपये कमावले आहेत. रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटानं बजेटपेक्षा जास्त कमाई केली.