मुंबई - 'पठाण' चित्रपट रिलीज होऊन जवळपास एक महिना उलटला असून, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची दमदार कमाई अद्यापही सुरू आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, अॅक्शनने भरलेल्या या चित्रपटाने हिंदी भाषेमध्ये 500 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
इतके मोठे यश आजच्या काळात मिळणे हे बॉलिवूडसाठी खूप महत्त्वाचे होते. गेल्या काही वर्षापासून कोविडमुळे चित्रपटसृष्टीचे व्यवाहार ठप्प झाले होते. जे काही चित्रपट रिलीज झाले त्यातील बहुतांशी चित्रपट तिकीट बारीवर आपटले. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवले आहे का, असे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पठाणने मिळवलेले यश खूप मोलाचे आहे.
500 कोटी मिळवणे केवळ ऐतिहासिकहा मैलाचा दगड गाठल्यावर, सिद्धार्थ आनंद म्हणाला, 'पठाण जागतिक स्तरावर लोकांचे मनोरंजन करत आहे याबद्दल मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. जगभरात 1000 हून अधिक कोटी कमाई करणे आणि हिंदी आवृत्तीमध्ये 500 कोटी नेट मिळवणे केवळ ऐतिहासिक आहे आणि आम्ही त्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभारी आहोत. पठाणवर लोकांनी आनंदाचा वर्षाव केला आहे. एक दिग्दर्शक म्हणून, जागतिक स्तरावर इतक्या लोकांना आनंद देणारा चित्रपट बनवल्याचा मला अभिमान वाटतोय.
हा एक अविश्वसनीय पराक्रमसिद्धार्थने कबूल केले की त्याला 'पठाण' चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वकालीन सर्वात मोठा ब्लॉकबस्टर प्रदर्शित करायचा होता.'जेव्हा आम्ही आमच्याकडे असलेल्या स्टार-कास्टसह पठाण बनवायला सुरुवात केली तेव्हा मला माहित होते की आम्ही आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संख्येचा पाठलाग करत आहोत, पण माझ्या स्वप्नातही मी कधीच कल्पना केली नव्हती की पठाण हा ४०० कोटींचा टप्पा गाठणारा पहिला हिंदी चित्रपट होईल. हा एक अविश्वसनीय पराक्रम आहे जो मला आणि आम्हा सर्वांना यशराज फिल्म्स आणि टीमला अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देत आहे,' असे तो पुढे म्हणाला.
दुर्मिळ कामगिरी आहे'पठाण'ने रेकॉर्ड तोडणे ही दुर्मिळ कामगिरी असल्याचे सिद्धार्थने सांगितले. 'मला माहित आहे की जगभरातील प्रेक्षकांशी जोडला गेलेला चित्रपट देण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे, आता यापुढे मी बनवलेल्या प्रत्येक चित्रपटात मला अंतर पार करावे लागेल. हा क्षण पठाणच्या संपूर्ण टीमसाठी आहे. संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीला त्याचा आस्वाद घ्यावा लागेल कारण ही एक दुर्लभ, दुर्मिळ कामगिरी आहे,' असे त्याने शेअर केले. 25 जानेवारी रोजी रिलीज झालेल्या पठाणमध्ये शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा -Rakhi Sawant Came To Mysore Court : हिंदू असल्यामुळे आदिलचे वडील मला स्वीकारत नाहीत राखी सावंत