महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांच्या मुलाच्या लग्नात 'तारक मेहता'च्या कलाकारांनी लावली हजेरी - तारक मेहता का उल्टा चष्मा

Dilip Joshi Son Wedding: जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांच्या मुलाच्या लग्नात 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात दिशा वकानी देखील उपस्थित होती.

Dilip Joshi Son Wedding
दिलीप जोशी यांच्या मुलाचं लग्न

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 5:03 PM IST

मुंबई - Dilip Joshi Son Wedding: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांचा मुलगा ऋत्विक जोशीचं 18 डिसेंबर रोजी लग्न होत आहे. जोशी कुटुंब सध्या या लग्नाचा आनंद घेत आहे. दरम्यान सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दिलीप जोशी यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील कलाकारांनी हजेरी लावली. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी देखील लग्नात सहभागी झाली होती. दिशा वकानीची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. अनेक चाहते तिला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये पाहण्यासाठी आतुर आहेत. यापूर्वी दिशा या शोमध्ये परत येणार असल्याच्या खूप चर्चा सुरू होत्या.

दिलीप जोशीच्या मुलाचं लग्न :सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या लग्नाच्या व्हिडिओमध्ये दिलीप जोशी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि ऋत्विकसोबत दिसत आहेत. या लग्न सोहळ्यात प्रत्येकजण खूप आनंदी आणि उत्साही दिसत आहे. जेठालाल पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि पगडी घातलेला दिसत आहे. तर त्यांची मुलगी नियतीनं निळ्या रंगाची साडी नेसली आहे. नियतीचे केस हे राखाडी रंगाचे दिसत आहे. तिच्या लग्नातही तिचे राखाडी केस होते. यामुळं चाहत्यांनी तिची खूप प्रशंसा केली होती. तिच्या लग्नातील अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाली होती.

दिशा वकानी मुलीसोबत दिसली : व्हायरल झालेल्या लग्नाच्या फंक्शनच्या फोटोंमध्ये दिशा गुलाबी रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. दिशा वकानीची गोंडस मुलगीही तिच्यासोबत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिशा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमधून गायब आहे. या शोमध्ये ती दिलीप जोशी यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. या फंक्शनमध्ये सुनैना फौजदार जांभळ्या रंगाच्या पोशाखात दिसली. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये कोमल हाथीची भूमिका साकारणारी अंबिका लाल रंगाच्या साडीत होती. याशिवाय या कार्यक्रमात नितीश भालुनी, पलक सिधवानी हे कलाकार देखील उपस्थित आहेत.

हेही वाचा :

  1. विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर'नं 100 कोटींचा टप्पा केला पार
  2. 'सालार'च्या तुलनेत 'डंकी'ची बॉक्स ऑफिसवर मोठी आघाडी
  3. अनन्या पांडेनं शेअर केला तिचा बालपणीचा व्हिडिओ, चाहत्यांनी केल्या कमेंट्स

ABOUT THE AUTHOR

...view details