मुंबई :रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर आगामी फॅमिली-ड्रामा चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मधील चौथे गाणे 'ढिंढोरा बाजे रे' २४ जुलै रोजी कोलकातामध्ये रिलीज करण्यात आले आहे. रणवीर आणि आलिया आज प्रमोशनसाठी कोलकातामध्ये गेले असताना त्यांनी चित्रपटामधील गाणे रिलीज करून चाहत्यांना एक भेट दिली आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची स्टारकास्ट रणवीर आणि आलिया चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये जात आहेत. करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातील हे चौथे गाणे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्याला अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून हे गाणे दर्शन रावल आणि भूमी त्रिवेदी यांनी गायले आहेत. या चित्रपटाचे 'तुम क्या मिले', 'झुमका' आणि 'वे कमलिया' ही तीन गाणी आधीच रिलीज झाली आहेत.
'ढिंढोरा बाजे रे' गाणे रिलीज :या गाण्यात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दुर्गा पूजा पंडालमध्ये जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या गाण्यात 'रानी' (आलिया) आणि 'रॉकी' (रणवीर सिंग) लाल रंगाचे कपडे परिधान करून दुर्गापूजेत सामील झाले आहेत. गाण्यामध्ये रणवीर आणि आलिया 'रॉकी' आणि 'राणी'च्या भूमिकेत आपापल्या कुटुंबियांसमोर आपले प्रेम दाखवताना दिसत आहेत. 'ढिंढोरा बाजे रे' गाण्यात असे दिसत आहे की, रॉकी आणि राणीचे कुटुंब त्यांच्या प्रेमाच्या विरोधात आहेत, कारण या दोन कुटुंबांच्या चालीरीती पूर्णपणे भिन्न आहेत. या चित्रपटामध्ये आलिया आणि रणवीर व्यतिरिक्त जया बच्चन, शबाना आझमी, धर्मेंद्र, प्रीति जिंटा हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.