महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Deepika Padukone trolled : सोनाक्षी सिन्हाच्या लूकची 'कॉपी' केल्याने दीपिका पदुकोण ट्रोल झाली - ड्रेसची केली कॉपी

दीपिका पदुकोण नुकतीच सोनाक्षी सिन्हा सारखा कॉ-ऑर्डर सेट ड्रेसमध्ये दिसली. नेटिझन्सच्या हे लक्षात आल्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले

Deepika Padukone
दीपिका पदुकोण

By

Published : Jul 1, 2023, 2:30 PM IST

मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. अनेकदा स्टाइलिश पोशाखांमध्ये दिसते. फॅशनच्या बाबतीत अनेकजण तिला फॉलो करतात. आता अलीकडेच दीपिकाने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने परिधान केल्या ड्रेस सारखा ड्रेस घातला आणि हे नेटिझन्सच्या निदर्शनास आले. त्यानंतर सारखा ड्रेस असल्यामुळे नेटिझन्सने दीपिकाला ट्रोल केले.

पापाराझीने शेअर केला दीपिकाचा व्हिडिओ : इंस्टाग्रामवर पापाराझी अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, दीपिका प्रिंटेड केशरी आणि नीलमणी निळ्या रंगाच्या कॉ-ऑर्ड आउटफिटमध्ये दिसत आहे. तिने मॅचिंग पलाझो पॅन्टसह एक लांब, मोठ्या आकाराचा यावर शर्ट घातला आहे. तिने टॅन्ड हील्ससह हँडबॅग घेतली आहे. याशिवाय तिने केसचा बन बांधला आहे. यावर तिने ओसरी मेकअप केला आहे. दीपिकाचा हा अनोखा पोशाख सिल-सिलाने डिझाइन केला आहे. तिच्या लूकवर प्रतिक्रिया देताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहले 'मला तिचा पोशाख आवडला' तर दुसर्‍या वापरकर्त्याने कमेंट केली, 'हा प्रिंट्स ड्रेस आजकाल ट्रेंडमध्ये आहेत.' आणखी एका चाहत्याने लिहिले, 'खूप सुंदर!' आणखी दुसर्‍याने लिहिले, 'उत्तम दर्जाचा ड्रेस अप.' इतर वापरकर्त्यांनी हार्ट डोळे आणि लाल हृदय इमोजीसह कमेंट केल्या आहे.

दीपिकाला केले ट्रोल : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील अशाच सिल-सिला पोशाख परिधान केला होता. काही सोशल मीडिया युजरने याची दखल घेतली आहे. त्यानंतर दीपिकाच्या या पोस्टला ट्रोल केल्या जात आहे, या पोस्टवर एका वापरकर्त्याने कमेंट केली आहे, 'ज्याने पहिले ते घातले ते मोजले जात नाही, तिने ते चांगले परिधान केले!! 'काही दिवसांपूर्वी सोनाक्षीनेही हाच ड्रेस परिधान केला होता' अशी कमेंट केली आहे तर आणखी एकाने कमेंट करत लिहले, 'सोनाक्षीने दोन दिवसांपूर्वी हाच ड्रेस घातला होता म्हणजे दीपिकाने सोनाक्षीच्या ड्रेसची कॉपी केला आहे' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहे.

वर्कफ्रंट : दरम्यान, दीपिकाच्या वर्क फ्रंटवर बोलायचे झाले तर ती, ब्लॉकबस्टर पठाणनंतर, आगामी चित्रपट जवानमध्ये एक छोटीशी भूमिका साकारण्यासाठी सज्ज आहे. तसेच ती प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दिशा पटानी आणि इतर अनेक कलाकार असलेल्या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर प्रोजेक्ट के मधून तेलगू सिनेमात पदार्पण करणार आहे.

हेही वाचा :

  1. 11 Bollywood Couples : वयातील धक्कादायक अंतर असलेली ११ बॉलीवूड जोडपी
  2. BOX OFFICE COLLECTION DAY 2 : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या कमाईचा वेग बॉक्स ऑफिसवर मंदावला
  3. Parineeti and Raghav potted : परिणीती आणि राघव चढ्ढा अमृतसर विमानतळावर दाखल, जोडपे श्री हरमंदिर साहिबला देणार भेट

ABOUT THE AUTHOR

...view details