महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

"मला आई व्हायचंय", दीपिका पदुकोणनं व्यक्त केल्या भावना - दीपिकाला आई बनायची इच्छा

Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण होत आहेत. आता ती तिच्या चाहत्यांना लवकरच आनंदाची बातमी देत असल्याचं समजत आहे.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 5:53 PM IST

मुंबई - Deepika padukone : हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. अनेक टीव्ही जोडपी आता आई-वडील झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यामुळे दीपिका आणि रणवीर लवकरच आनंदाची बातमी देणार असल्याचं चाहत्यांना वाटत आहे. या जोडप्याचं लग्न 2018 मध्ये झालं होतं. आता दीपिका पदुकोणनं आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ती वयाच्या 37 व्या वर्षी आई बनण्याचा विचार करत आहे. दीपिका पदुकोणनं नुकतेच एका मुलाखतीत कुटुंब नियोजनावर मोकळेपणानं संवाद केला.

दीपिका आणि रणवीरला बनायचं आहे आई- बाबा :या मुलाखतीत दीपिका पदुकोणनं म्हटलं आहे की, ''रणवीर आणि मला मुले खूप आवडतात. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत जेव्हा आम्हाला मुले होतील, मी जेव्हाही माझ्या नातेवाईकांना भेटते तेव्हा ते म्हणतात की तू अजिबात बदलली नाहीस. एक गोष्ट आहे की, इंडस्ट्रीत चेहरा आणि पैशानं चमकणे सोपे आहे, पण मला कोणीही घरात स्टार मानत नाही, कारण कुटुंबात मी प्रथम मुलगी आहे मला एक लहान बहीण आहे. मला असेही वाटते की रणवीर आमच्या मुलांना खूप चांगले संस्कार देईल.'' दरम्यान, दीपिका आई होणार अशा चर्चा सोशल मीडियावर सध्या सुरू आहे.

दीपिका पदुकोणचा वर्क फ्रंट :गेल्या वर्षी दीपिका पदुकोण शाहरुख खानच्या 'पठाण' आणि 'जवान' या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये दिसली होती. आता दीपिका आणि हृतिक रोशन स्टारर चित्रपट 'फायटर' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 'फायटर' हा चित्रपट प्रदर्शित होत असून, हा चित्रपट 'पठाण' दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने बनवला आहे. या चित्रपटामध्ये दीपिका आणि हृतिक हे अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. सध्या दीपिकाचे चाहते तिच्या या आगामी चित्रपटाची वाट आतुरतेनं पाहत आहेत.

हेही वाचा :

  1. जान्हवी कपूरनं श्रीदेवीच्या आकस्मिक मृत्यू आणि कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियाबद्दल केला खुलासा
  2. प्रीटी झिंटानं पती जीन गुडनॉफसोबत केला फोटो शेअर
  3. आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खानचा विवाह मोठ्या थाटामाटात पडला पार

ABOUT THE AUTHOR

...view details