महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Deepika nails airport look : प्रोजेक्ट केच्या शूटसाठी हैदराबादला निघताना दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक - कमल हासन यांच्याही प्रमुख भूमिका

दीपिका पदुकोण लवकरच नागअश्विन दिग्दर्शित प्रोजेक्ट के मध्ये दिसणार आहे. ती हैदराबादमध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाताना मुंबई विमानतळावर दिसली. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, दिशा पटानी आणि आता कमल हासन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Deepika nails airport look
दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक

By

Published : Jun 26, 2023, 12:15 PM IST

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने मुंबई विमानतळावर हैदराबादसाठी जात असताना एअरपोर्ट लूकमध्ये दिसली. प्रोजेक्ट के या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी ती रवाना झाला. अभिनेता प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्याही भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे.

दीपिका पदुकोणचा स्टायलिश एअरपोर्ट लूक- इंस्टाग्रामवर एका पापाराझी अकाऊंटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दीपिका ब्राऊन रंगाच्या ट्रॅकसूटमध्ये मुंबई विमानतळावर येताना दिसत आहे. त्यात वाइड-लेग ट्रॅक पॅंटची बेज जोडी आणि समोरचे जिपर, पांढरे कफ आणि स्लीव्हजवर पट्टे असलेले कॉलर केलेले जाकीट तिने परिधान केले होते. तिने तिचे केस पोनीटेलमध्ये बांधले होते. दीपिका विमानतळावर पोहोचताच पापाराझींनी तिला फोटोसाठी विचारले. तिने स्मितहास्य देत फोटोसाठी पोझ दिल्या.

चाहत्यांचा दीपिकावर कौतुकाचा वर्षाव- व्हिडिओ शेअर होताच, दीपिकाच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. एका चाहत्याने ‘दीपिका द क्वीन’ अशी कमेंट केली. तर दुसर्‍या चाहत्याने तिला आश्चर्यकारक! म्हटले. तिची स्टाइल, स्मितहास्य आणि लूकची भरपूर चर्चा युजर्सनी आपल्या कमेंटमध्ये केल्याचे दिसते.

प्रोजेक्ट के मध्ये कमल हासनची एन्ट्री- दरम्यान, रविवारी साऊथ सुपरस्टार कमल हासन प्रोजेक्ट के चित्रपटामध्ये खलनायक म्हणून सामील होणार असल्याची खात्रीशीर बातमी पाहायला मिळाली. या पॅन इंडिया चित्रपटात कमल हासन आणि प्रभास पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येतील. चित्रपटाचे जवळपास 70 टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे, तर दीपिका आणि बिग बी यांच्या सीनचे काम अद्याप पूर्ण व्हायचे आहे. प्रोजेक्ट के हा एक द्विभाषिक चित्रपट आहे जो एकाच वेळी विविध ठिकाणी हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये शूट केला जात आहे.

प्रोजेक्ट के च्या सेटवर बिग बी जखमी - प्रोजेक्ट केच्या शुटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली होती. त्यांच्या बरगडीला गंभीर दुखापत झाल्यानंतर शुटिंग थांबवण्यात आले होते. त्यानंतर बच्चन मुंबईला परतले आणि सुमारे एक महिना उपचार घेून पुन्हा शुटिंगसाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान याच चित्रपटाच्या शुटिंगमध्ये दीपिका पदुकोणलाही आजारपणाचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा -

१.Netflix Tudum 2023 : आलिया भट्टने नेटफ्लिक्स इव्हेंटला गॅल गॅडोट, जेमी डोर्ननसह लावली हजेरी

२.31 Years Of Srk In Film Industry Completed : किंग खानने इंडस्ट्रीमध्ये ३१ वर्षे पूर्ण केल्यामुळे 'आस्क एसआरके'शो ट्विटरवर केला होस्ट

३.Bigg Boss Ott 2: सलमान खान बिग बॉसच्या घरातून कुणाला बाहेर काढणार?

ABOUT THE AUTHOR

...view details