महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Deepika Padukone halarious Video : दीपिका पदुकोण दिलं ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर; व्हिडिओ झाला व्हायरल... - दीपिका पदुकोण झाली ट्रोल

Deepika Padukone halarious Video : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सध्या चर्चेत आली आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिला ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहे.

Deepika Padukone halarious Video
दीपिका पदुकोणचा खळबळजनक व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 1:48 PM IST

मुंबई - Deepika Padukone halarious Video:बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नुकतीच करण जोहरच्या टॉक शो 'कॉफी विथ करण 8' मध्ये दिसली होती. या शोमध्ये तिनं अनेक तिच्याविषयी खुलासे केले आहे. दीपिकाच्या रिलेशनशिपवर खुलासा झाल्यानंतर अनेकजण तिला सोशल मीडियावर ट्रोल करत आहे. आता दीपिकानं तिच्या सर्व ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे. दीपिका पदुकोणनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ खूप मजेदार आहे. यामध्ये ती म्हणत आहे, खूप सुंदर, खूप मोहक. 'जस्ट लुकिंग लाइक अ व्वा'.

दीपिका पदुकोणचा व्हिडिओ झाला व्हायरल :गुरुवारी 'कॉफी विथ करण 8' एपिसोड प्रसारित झाल्यापासून दीपिका पदुकोण ट्विटरवर ट्रेंड करत आहे. या शोमधील तिच्या कमेंटमुळे तिला अनेकजण धारेवर धरत आहे. दीपिका पदुकोण 'कॉफी विथ करण सीझन 8'मध्ये केलेल्या कमेंटमुळे चर्चेत आहे. दीपिकाच्या केलेल्या कमेंटमुळं तिला अनेकजण ट्रोल करत फटकारत आहेत. दीपिकानं शेअर केल्या व्हिडिओमध्ये तिला या गोष्टीचा फारसा फरक पडत नसल्याचं दिसून येत आहे. नुकताच दीपिकानं सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती 'जस्ट लुकिंग लाइक अ वाह' ट्रेंड फॉलो करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत तिनं 'जस्ट लुकिंग लाइक अ वॉव' असंही कॅप्शन लिहिले आहे.

दीपिका पदुकोण व्हिडिओवर आल्या कमेंट : दीपिका पदुकोणचा पती रणवीर सिंगनं या व्हिडिओवर कमेंट केली आहे. यावर करण जोहरनं लिहलं 'मला हे खूप आवडले' अशी प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाची धाकटी बहीण अनिशा हिनेही लिहलं, 'पण तू माउस कलर का घातला नाहीस?' सध्या सोशल मीडियावर 'जस्ट लुकिंग लाइक अ वाह' आणि 'मै फना है माउस कलर' हे दोन व्हिडिओ सध्या ट्रेंड करत आहेत. कॉफी काउचवर दीपिकानं खुलासा केला की, ती आणि रणवीर एकमेकांशी नात्यामध्ये बांधील नव्हते. रणवीरनं तिला प्रपोज करेपर्यंत ती इतर लोकांनाही भेटत होती. दीपिकाच्या जर वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'जवान'मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुप्परहिट झाला. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत शाहरुख खान होता. ती 'सिंघम अगेन' 'फायटर' आणि 'कल्की 2898 एडी' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Matthew Perry death : 'फ्रेंडस' फेम अभिनेता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूनंतर अमेरिकेतील सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त...
  2. kangana Ranaut Tejas : 'तेजस' पाहण्यासाठी कंगनानं चाहत्यांना थिएटरमध्ये जाण्याचे प्रेक्षकांना केलं आवाहन...
  3. Matthew Perry Death : फ्रेंड्स मालिकेतील अभिनेता मॅथ्यू पेरीचा टबमध्ये आढळला मृतदेह, लॉस एंजेलिस पोलिसांकडून तपास सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details