मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक रोमँटिक 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाला 20 ऑक्टोबर रोजी 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. बॉलिवूडचा 'बादशाह' आणि 'किंग ऑफ रोमान्स' शाहरुख खानने या चित्रपटातून आपली रोमँटिक इमेज तयार केली होती. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोल यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसली आणि ही जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक रोमँटिक जोडी बनली. या जोडीला त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून खूप चाहते मिळाले, जे आजही त्यांच्या जोडीचे वेड आहेत.
4 कोटींमध्ये बनला होता DDLJ- 1995 साली 4 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'DDLJ' सिनेमाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर 89 कोटींचा व्यवसाय केला होता. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 89 कोटी आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर 13.50 कोटी. त्यावेळी चित्रपटाची एकूण कमाई 102 कोटी रुपये होती.
राज-सिमरनची जोडी गाजली - या चित्रपटातील शाहरुख खान आणि काजोल यांच्यातील रोमान्स या जोडप्याच्या चाहत्यांना अजूनही आवडतो. आजही शाहरुख-काजोलची राज-सिमरमन जोडी चाहत्यांच्या हृदयात कायम आहे.
आदित्य चोप्राने या चित्रपटाद्वारे केले पदार्पण - दिवंगत दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मोठा मुलगा आदित्य चोप्रा याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाची निर्मिती यश चोप्रा यांनी केली होती. या चित्रपटाद्वारे आदित्य चोप्राने दिग्दर्शनात पदार्पण केले. हा चित्रपट एवढा हिट ठरेल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती.
चित्रपटातील गाण्यांनी मोडले रेकॉर्ड- 'मेहंदी लगा के रखना' या गाण्याशिवाय भारतीय लग्न पूर्ण होत नाही. या गाण्याची क्रेझ तेव्हाही तेवढीच आहे. याशिवाय 'तुझे देखा तो', 'ना जाने मेरे दिल को क्या हो गया', 'जरा सा झूमलूँ मै', 'मारे ख्वाबों में जो आये' आणि 'रुकजा ओ दिल दिवाने' या चित्रपटातील सर्व गाणी हिट ठरली आहेत.