महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Dalljiet Kaur and Nikhil Patel : टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हनीमूनसाठी पोचली थायलंडला - दलजीत कौर हनीमूनवर

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर बिझनेसमन पती निखिल पटेलसोबत हनीमूनसाठी बँकॉक (थायलंड) येथे गेली आहे. येथे या जोडप्याने त्यांच्या पहिल्या ऑफिशियल डेटचा आनंद लुटला.

Dalljiet Kaur and Nikhil Patel
टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर

By

Published : Mar 20, 2023, 2:11 PM IST

हैदराबाद : टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरने नुकतेच यूकेस्थित भारतीय एनआरआय उद्योगपती निखिल पटेलशी लग्न केले. दलजीत कौर आणि निखिल या दोघांचे देखिल हे दुसरे लग्न आहे. लग्नानंतर दोघे हनीमूनसाठी थायलंडला पोहोचले आहेत. येथून या जोडप्याने त्यांचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दलजीत आणि निखिलचा सुंदर लूक दिसत आहे. येथे हे कपल लग्नानंतरची पहिली ऑफिशियल डेट एन्जॉय करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये पोहोचले आहे. या सुंदर डेटसाठी दलजीतनेही आपल्या नवऱ्याचे आभार मानले आहेत.

असे लिहीले कॅपशन : ही छायाचित्रे शेअर करताना दलजीतने लिहिले, श्री आणि सौ. पटेल यांची थायलंडमधील पहिली ऑफिशियल डेट अप्रतिम आहे. मिशेलिन स्टार रेस्टॉरंटने 80/20 रेट केले आहे, शेफ अँड्र्यू मार्टिन आणि त्यांच्या टीमने 3 तासांचा स्वादिष्ट मेनू तयार केला आहे जो संपूर्ण दौर्‍यात लक्षात राहील, धन्यवाद पती!'

हातात लाल लग्नाचा चुडा : दिलजीतने शॉर्ट स्कर्टवर काळ्या रंगाचा क्रॉर टॉप आणि हातात लग्नाचा लाल चुडाघातला आहे. तर निखिल काळ्या आणि गडद निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये मस्त दिसत आहे. 'इस प्यार को क्या नाम दूं', काला टिका आणि बिग बॉसमध्ये दिसलेली अभिनेत्री दलजीतने 2009 मध्ये टीव्ही अभिनेता शालीन भानोतसोबत पहिले लग्न केले होते आणि लग्नाच्या 6 वर्षानंतर दोघांनी 2015 मध्ये घटस्फोट घेतला होता.

दुसरा जीवनसाथी: दलजीतला तिच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगा होता, तो देखील लग्नाला उपस्थित होता. घटस्फोटाच्या 8 वर्षांनंतर दलजीतला दुसरा जीवनसाथी सापडला आणि शालीन अजूनही घटस्फोटित आहे. निखिलचे हे दुसरे लग्न देखील आहे, निखिलला त्याच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे आणि ती तिच्या वडिलांच्या लग्नाला गेली होती. आता नवविवाहित जोडपे दोन्ही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी स्वत: घेत आहेत.

प्री-वेडिंगपासून लग्नापर्यंत : दलजीत कौरने इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसह प्री-वेडिंगपासून लग्नापर्यंतच्या प्रत्येक विधीची छायाचित्रे शेअर केली आहेत. हळदी, मेंदी आणि संगीताचे फोटो शेअर केल्यानंतर दलजीतने तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. ही छायाचित्रे शेअर करताना दलजीतने 'मिस्टर अँड मिसेस पटेल' असे कॅप्शन दिले आहे. अंजली लिल्लाहियाने डिझाइन केलेल्या पांढऱ्या लेहेंग्यात दलजीत कौर अतिशय सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे ब्रिटिश बिझनेसमन निखिल पटेल पांढऱ्या रंगाच्या शेरवानी आणि सफामध्ये दिसला.

हेही वाचा :Alka Yagnik Birthday : दिग्गज पार्श्वगायिका अल्का याज्ञिकच्या करीअरला झाली अशी सुरूवात; आता आहे कोटींची मालकीण

ABOUT THE AUTHOR

...view details