मुंबई :संपूर्ण जग भारताच्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान 3' च्या लँडिंगची आतुरतेने वाट पाहत आहे. लँडर बुधवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी 6 वाजता चंद्रावर उतरेल. 'चांद्रयान 3' साठी सर्व बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
प्रकाश राज यांच्यावर कारवाईची मागणी : दरम्यान, चांद्रयान 3 संदर्भात प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांची एक पोस्ट चर्चेचा विषय ठरतंय. बनहट्टी शहरातील रहिवासी शिवानंद गायकवाड यांनी, 'चांद्रयान 3' बद्दल सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून प्रकाश राज यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन पोलिसांना केलंय. प्रकाश राज यांनी देशातील वैज्ञानिकांची खिल्ली उडवली असल्याचा आरोप शिवानंद यांनी केलाय. त्यामुळे प्रकाश राज यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय.
काय पोस्ट केली होती : लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज यांनी रविवारी त्यांच्या सोशल मीडियावर एका चहा विक्रेत्याचे व्यंगचित्र शेअर केले होते. यामध्ये तो चहा सांडताना दिसत आहे. त्यात त्यांनी लिहिले की, '#VikramLander द्वारा चंद्रावरील पहिले चित्र, Wowwww'. त्यांच्या या ट्विटवर लोकांनी तीव्र आक्षेप घेतलाय. अनेक युझर्सनी प्रकाश राज यांना चांद्रयान मिशनचा आदर करण्याचा सल्ला दिला. राज हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. या पोस्टमुळे ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले. एका ट्रोलरने म्हटले, 'मोदींबद्दलच्या तुमच्या आंधळ्या द्वेषापाई #चांद्रयान3 ची खिल्ली उडवताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही आमच्या शास्त्रज्ञांची चेष्टा करत आहात, ज्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक वर्षे यासाठी घालवली आहेत.
पुन्हा पोस्ट करून खुलासा केला : त्यानंतर काही वेळाने प्रकाश राज यांनी पुन्हा एक पोस्ट टाकून आपल्या विनोदाचा खुलासा केला. प्रकाश राज यांनी स्पष्ट केले की, त्यांची पोस्ट पूर्वीच्या विनोदाशी संबंधित होती. प्रकाश राज यांनी ट्विट केले की 'द्वेष केवळ द्वेषाला पाहतो.. मी आर्मस्ट्राँग टाईम्स मधील एका विनोदाचा संदर्भ देत होतो.. ट्रोलर्सनी कोणता चायवाला पाहिला?? .. जर तुम्हाला विनोद समजत नसेल तर जोक तुमच्यावर आहे.. मोठे व्हा #justasking.., असे प्रकाश राज म्हणाले.
हेही वाचा :
- कशी होणार 'Chandrayaan ३' ची सॉफ्ट लँडिंग, तज्ज्ञांकडून जाणून घ्या A to Z
- Chandrayaan 3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिंगसाठी 'विक्रम'समोर अनेक आव्हानं, जाणून घ्या सविस्तर
- ...तर 'चांद्रयान 3' चं लॅंडिंग पडणार लांबणीवर, वाचा इस्रोचे शास्त्रज्ञ असे का म्हणाले