हैदराबाद: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सांगितले की, द केरळ स्टोरी हा चित्रपट राज्यात करमुक्त असेल. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारने या चित्रपटावर बंदी घातल्याच्या एका दिवसानंतर आदित्यनाथ यांनी लगेच दुसऱ्या दिवशी अशी घोषणा केली आहे. केरळ या राज्यमध्ये काही गटांद्वारे महिलांना धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते, असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तसेच धर्मांतरीत करुन या महिलांना देशाविरोधात कटामध्ये सामील करण्यात येते, अशा काही घटना या या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.
वादग्रस्त चित्रपट : उत्तर प्रदेशमध्ये 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट करमुक्त केला आहे असे , ट्विट योगी आदित्यनाथ यांनी हिंदीत लिहिले आहे. तसेच, यूपीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या अधिकृत खात्याने ट्विट केले की मुख्यमंत्री आदित्यनाथजी त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह 12 मे 2023 रोजी लखनौमध्ये द केरळ स्टोरी चित्रपट पाहतील. मध्य प्रदेशानंतर, उत्तर प्रदेश हे 'द केरळ स्टोरी'ला करमुक्त करणारे दुसरे राज्य बनले आहे. यापुर्वी शनिवारी सीएम शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, हा चित्रपट राज्यात करमुक्त असेल. चौहान यांनी पुढे सांगितले की, मध्य प्रदेशात, आम्ही आधीच धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा केला आहे. प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा कारण यातून जनजागृती होते. पालक, मुले आणि मुलींनी पाहण्याची शिफारस केली आहे. त्यामुळेच मध्य प्रदेश सरकारने हा चित्रपट करमुक्तकेला आहे. त्यानंतर कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एका भाषणादरम्यान यांनी दहशतवादी षड्यंत्र उघड केल्याबद्दल चित्रपटाचे कौतुक केले. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर कडाडून टीका देखील केली.