महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Odisha train accident : सेलिब्रिटींनी ओडिशा ट्रेन अपघातावर व्यक्त केला शोक

लोकप्रिय सेलिब्रिटी चिरंजीवी, ज्युनियर एनटीआर, सलमान खान, सनी देओल आणि किरण खेर यांनी ओडिशा रेल्वे अपघाताविषयी शोक व्यक्त केला आहे. या घटनेमध्ये 238 लोक मरण पावले तर 900 जण जखमी झाले आहे.

Odisha train accident
ओडिशा ट्रेन अपघात

By

Published : Jun 3, 2023, 12:36 PM IST

मुंबई :शुक्रवारी रात्री ओडिशामध्ये झालेल्या एका भीषण रेल्वे अपघातासाठी जगभरातून मोठ्या संख्येने लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी चिरंजीवी, ज्युनियर एनटीआर, सलमान खान, सनी देओल आणि किरण खेर यांनी देखील ओडिशा ट्रेन दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या अपघातात 238 लोक मरण पावले आणि 900 जखमी झाले आहेl. तसेच या घटनेबाबत काही सेलिब्रिटींनी दुःख व्यक्त केले आहे. या घटनेबाबत चिरंजीवी म्हणाले, ओडिशातील कोरोमंडल एक्स्प्रेस अपघात आणि जीवितहानी यामुळे मी पूर्णपणे हादरलो! मी शोकाकुल कुटुंबांसोबत आहे. पुढे ते म्हणाले, जीव वाचवण्यासाठी रक्ताची नितांत गरज आहे हे मला समजले आहे. माझ्या सर्व चाहत्यांना आणि जवळच्या भागातील मान्यवरांनी रक्तदानासाठी सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. ज्युनियर एनटीआरनेही घटनेबाबत दुःख व्यक्त करत म्हटले, या दुःखद रेल्वे अपघातामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबियांना आणि प्रियजनांप्रती मनापासून संवेदना. या विनाशकारी घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांसोबत मी आहे. या कठीण काळात त्यांना बळ आणि आधार मिळो.असे त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

सेलिब्रिटींनी केला शोक व्यक्त : अभिनेत्री आणि राजकारणी किरण खेर यांनी देखील ट्विटरवर त्यांच्या पोस्टमध्ये या घटनेबाबत दुःख व्यक्त करत लिहिले, 'ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताबद्दल ऐकून फार दुःख झाले. शिवाय जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच याप्रकरणी सलमान खानने देखील दुःख व्यक्त करत लिहले, 'दुर्घटनेबद्दल कळून खूप वाईट वाटले. जखमींना आणि पीडित कुटुंबाला या दुःखातून बाहेर येण्याची शक्ती देव देवो. तर या प्रकरणी सनी देओल लिहिले, 'ओडिशातील बालासोर येथे झालेल्या वेदनादायक रेल्वे अपघाताबद्दल ऐकून फार वाईट वाटले. या रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना...

ओडिसा रेल्वे अपघात : रेल्वे रुळावरून घसरल्याच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने शनिवारी एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे रुळावरून घसरलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी पीएमएनआरएफ मधून मृतांच्या नातेवाईकांना एक्स-ग्रेशिया रक्कम वाटप केली जाणार आहे.

हेही वाचा :

  1. Neha singh rathore : लोकगायिका नेहा सिंह राठौरचा खास शैलीत महिला कुस्तीपटुंना पाठिंबा, गाण्यातून साधला केंद्र सरकारवर निशाणा
  2. The Night Manager Part II trailer : द नाईट मॅनेजर 2 च्या ट्रेलरची प्रतीक्षा सुरू, वेब सिरीजच्या स्ट्रिमिंग तारखेचीही घोषणा
  3. Sonakshi Sinha birthday : शत्रुघ्न सिन्हाने लेक सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्य केला कौतुकाचा वर्षाव

ABOUT THE AUTHOR

...view details