मुंबई : साऊथचा सुपरस्टार धनुष त्याच्या आगामी 'कॅप्टन मिलर' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. धनुषच्या या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेने पाहत आहेत. दरम्यान आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी या अॅक्शन चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. तसेच आज २८ जुलै रोजी धनुष हा ४० वर्षांचा झाला आहे. धनुषला त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. धनुषची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. धनुषने त्याच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी त्याच्या आगामी चित्रपट 'कॅप्टन मिलर'चा टीझर रिलीज केला असून चाहत्यांना खूश केले आहेत. धनुषच्या या आगामी चित्रपटाचा टिझर पाहून प्रेक्षक त्यांचे खूप कौतुक करताना दिसत आहेत.
'कॅप्टन मिलर' चित्रपटाचा टीझर रिलीज : 'कॅप्टन मिलर' चित्रपटाचा टीझर हा खूप जबरदस्त असून या टीझरमध्ये धनुष हा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. याशिवाय तो टिझरमध्ये बाईक चालविताना दिसत आहे. या टिझरमध्ये तो डाकूच्या लूकमध्ये दिसत असून त्याचा हा लूक चाहतांना खूप आवडला आहे. 'कॅप्टन मिलर' चित्रपटाच्या टीझरला युट्युबवर २९९००० चाहत्यांनी लाईक केले. अॅक्शन पिरियड चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण माथेस्वरन यांनी केले आहे. हा चित्रपट १९९८ च्या काळातील पार्श्वभूमीवर आधारित असून हा चित्रपट अॅक्शनने परिपूर्ण आहे.