मुंबई - Jawan Box Office Collection day 8 : शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट पहिल्या दिवसापासूनच खूप कमाई करत आहे. आतापर्यंत 'जवान' चित्रपटानं अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. किंग खानला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. अवघ्या सात दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 'जवान'नं 350 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप झपाट्यानं कमाई केली आहे. याशिवाय 'जवान' हा जगभरात खूप जबरदस्त कमाई करत आहे. 'जवान' चित्रपट सध्या रिलीजच्या आठव्या दिवसात आहे. हा चित्रपट आठव्या दिवशी किती कमाई करू शकतो हे आपण जाणून घेऊया...
'जवान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : सचनिल्कच्या रिपोर्टनुसार 'जवान'नं पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये 75 कोटी, दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी, तिसऱ्या दिवशी 77.83 कोटी, चौथ्या दिवशी 80.1 कोटी, पाचव्या दिवशी 30.5 कोटी आणि सहाव्या दिवशी 26 कोटी आणि सातव्या दिवशी 23.3 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 368.38 कोटी झालं आहे. हा चित्रपट आठव्या दिवशी 19.36 कोटीची कमाई करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 387.74 होईल. या चित्रपटाची जगभरातील कमाई 621 कोटीवर पोहचली आहे.
'जवान' बॉक्स ऑफिस कलेक्शन
- पहिला दिवस ७५ कोटी
- दुसरा दिवस ५३.२३ कोटी
- तिसरा दिवस 77.83
- चौथा दिवस 80.1 कोटी
- पाचवा दिवस 32.92
- सहावा दिवस 26 कोटी
- सातवा दिवस 23.3 कोटी
- आठवा दिवस 19.36 कोटी * कमाई करू शकेल.