महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Bollywood Celebs Wish to U-19 Indian Team : अंडर 19 युवा महिला खेळाडूंच्या यशााचे दिग्गज बॉलीवूड सेलिब्रिटींनी केले कौतुक - टीम इंडिया काला चश्मा

युवा महिला टीम इंडियाने पहिला अंडर-19 टी-20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे. या आनंदात बॉलिवूड स्टार्सनी टीमचे खूप खूप अभिनंदन केले आहे. दिग्गज बॉलीवूड अभिनेत्रींनी या मुलींचे कौतुक केले आहे. तसेच, त्यांच्या या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले आहेत.

bollywood celebs wish to U-19 Indian Women Cricket team lifts historic world cup
अंडर 19 युवा महिला खेळाडूंच्या यशाबद्दल दिग्गज बॉलीवूड सेलिब्रिटींनी केले कौतुक

By

Published : Jan 30, 2023, 12:58 PM IST

Updated : Jan 30, 2023, 1:48 PM IST

नवी दिल्ली : 'म्हारी चोरियां छोरों से कम है के' दंगल चित्रपटातील डायलाॅगने देशातील मुलींना एक नवीन जीवन दिले आहे. आता बघा, खरंच माझ्या मुलींनी असे केल आहे, जे अजिबात अपेक्षित नव्हते. खरे तर, रविवारी दक्षिण आफ्रिकेत महिला टीम इंडियाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करीत देशाला पहिला महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक भेट दिला. या ऐतिहासिक विजयावर संपूर्ण देशासह बॉलिवूड स्टार्सही खूश आहेत.

महानायक अमिताभ बच्चन यांनी केले टीम इंडियाचे कौतुक :भारतीय संघाच्या विजयाबद्द हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी मुलींचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यांनी यावर ट्विट करीत टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. या विजयाबद्दल बॉलीवूड सेलिब्रिटींनी महिला टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चनपासून ते अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रापर्यंत सर्वांनी टीम इंडियाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलीवूडचा स्टार अजय देवगणने केले अभिनंदन :टीम हिंदी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील आणि प्रतिभावंत कलाकार अजय देवगणनेसुद्धा भारतीय युवा खेळाडूंचे जोरदार अभिनंदन केले आहे.

बॉलीवूडने विजयाचा केला जल्लोष :टीम इंडियाच्या विजयाच्या आनंदात अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, 'भारत चॅम्पियन, क्रिकेटमधील महिला अंडर-19 विश्वचषक चॅम्पियनने ब्रिटिशांचा पराभव केला.

टीम इंडियाच्या विजयावर अजय देवगणने ट्विट केले, '#U19T20WorldCup चॅम्पियन होण्यासाठी किती क्लिनिकल अष्टपैलू कामगिरी आहे. ऐतिहासिक विजयाबद्दल मुलींचे अभिनंदन. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओलनेही केले ट्विट :या ऐतिहासिक विजयावर बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओलनेही ट्विट केले असून, 'अभिनंदन गर्ल्स फॅब्युलस' असे लिहिले आहे.

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींनी ऐतिहासिक विजयाबद्दल केले अभिनंदन :त्याचवेळी, बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री काजोल, करीना कपूर खान, अनुष्का शर्मा, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि आयुष्मान खुराना यांनीदेखील इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ऐतिहासिक विजयाबद्दल महिला संघाचे अभिनंदन केले आहे. आता चित्रपटसृष्टीतील सर्व तारे भारतीय संघाचे अभिनंदन करीत आहेत.

पहिला महिला अंडर-19 T20 विश्वचषक कोठे आयोजित करण्यात आला :पहिला महिला अंडर-19 T20 विश्वचषक 2023 दक्षिण आफ्रिकेच्या पॉचेफस्ट्रूममध्ये खेळला गेला. जिथे, महिला टीम इंडियाने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव करीत या विश्वचषकाची ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नसली, तरी गोलंदाजांनी मैदानात उतरून खेळ आपल्या नावावर केला.

'माझ्या मुली'ने काला चष्मावर डान्स केला :या आनंदात भारतीय युवा खेळाडूंनी मैदानात 'काला चष्मा' या बॉलिवूड गाण्यावर जोरदार डान्स केला. टीम इंडियाच्या विजयाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल महिला संघाचे खूप खूप अभिनंदन.

Last Updated : Jan 30, 2023, 1:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details