महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ameesha Patel News: अमिषा पटेल आज रांची न्यायालयात राहणार हजर, काय आहे नेमके प्रकरण? - Ameesha Patel in ranchi court

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल आज रांची न्यायालयात हजर होणार आहे. चेक बाऊन्स आणि फसवणूक प्रकरणात प्रत्यक्ष हजर राहण्याचे उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत आदेश दिले होते. तिने 17 जून रोजी न्यायालयात आत्मसमर्पण केल्यानंतर न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला आहे.

Ameesha Patel News
अमिषा पटेल आज रांची न्यायालयात राहणार हजर

By

Published : Jun 21, 2023, 10:28 AM IST

रांची : चेक बाऊन्स आणि फसवणूक प्रकरणी अभिनेत्री अमिषा पटेल अडचणीत सापडली आहे. जामिनावर असलेली पटेल ही आज रांची न्यायालयात हजर राहणार आहे. गदर फेम अभिनेत्री अमिषा पटेलने 17 जून रोजी चेक बाऊन्स प्रकरणी रांची न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. 10-10 हजारांचे दोन जातमुचलक भरल्यानंतर तिला जामीन देण्यात आला.

रांची चित्रपट निर्माते अजय कुमार सिंह यांनी अभिनेत्री अमिषा पटेल विरुद्ध चेक बाऊन्स आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अमिषा पटेलने धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने अनेकवेळा नोटिसा पाठवूनही अमिषा पटेल न्यायालयात गैरहजर राहिली. त्यानंतर न्यायालयाने तिच्याविरोधात वॉरंट जारी केले होते. वॉरंट जारी झाल्यानंतर ती 17 जून रोजी न्यायालयात हजर राहिली होती. अमिषा पटेलचा 2018 वर्षात अडीच कोटी रुपयांचा चेक बाऊन्स झाल्याचा निर्मात्याचा आरोप आहे. पैसे घेऊनही चित्रपटात काम केले नसल्याने निर्मात्याने गुन्हा दाखल केला. पैसे परत मागितल्यानंतर दिलेला चेकही वटला नसल्याने वाद वाढला. फसवणूक झाल्याचे निर्मात्याला लक्षात आल्यानंतर त्याने न्यायालयात धाव घेतली.

काय आहे निर्मात्याचा दावातीन कोटी रुपयांचा चेक बाऊन्स झाल्यानंतर आम्ही रांची न्यायालयात केस दाखल केली आहे. 'देसी मॅजिक' नावाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तिने माझ्याकडून घेतलेल्या पैशांबाबत कधीही उत्तर दिले नाही. सुरुवातीला, मला सांगण्यात आले होते की हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होईल. त्यानंतर मला सांगण्यात आले की तो सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होईल. माझे पैसे सप्टेंबरपर्यंत व्याजासह मिळणार असल्याचेही सांगितले. तरीही मला 3 कोटी रुपयांचा चेक देण्यात आला होता. चेक बाऊन्स झाल्यानंतर फॉलो-अप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने संपूर्ण दृष्टीकोन बदलला.

यापूर्वी न्यायालयाने बजावले होते समन्स :मुरादाबाद न्यायालयाने गतवर्षी अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिच्या तीन साथीदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. एका इव्हेंट कंपनीकडून 11 लाख रुपये अॅडव्हान्स घेऊनही ती लग्नाला पोहोचली नाही, असा तिच्यावर आरोप आहे. अमिषा आणि इतर आरोपींना समन्स बजावले होते, मात्र अमिषा कोर्टात हजर राहिली नव्हती. बॉलीवूड अभिनेता सनी देओलसह अमिषाचा 22 वर्षांपूर्वी 'गदर' हा सिनेमा गाजला होता. हा सिनेमा सिक्वलसह प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा-

  1. Gadar 2 teaser : गदर 2 च्या टीझरमुळे चाहत्यांची सनी देओल उर्फ तारा सिंगबद्दलची उत्सुकता वाढली
  2. Gadar 2 Movie Controversy: गदर 2 चित्रपट शूटिंग वादाच्या भोवऱ्यात...शीख संघटनांनी 'त्या' दृश्यावर आक्षेप
  3. Amisha Patel News: अभिनेत्री अमिषा पटेलची उच्च न्यायालयात धाव; काय आहे प्रकरण?

ABOUT THE AUTHOR

...view details