चेन्नई - संगीतकार इलयाराजा यांचा शुक्रवारी 80 वा वादिवस साजरा झाला.तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि ज्येष्ठ अभिनेता कमल हासन यांच्यासह इतरांनी इसाग्नानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच ज्येष्ठ दिग्दर्शक मणिरत्नम यांनाही त्यांनी ६७ व्या वाढदिवसानिमित्य शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी इलायराजा यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
एका ट्विटर पोस्टमध्ये, मुख्यमंत्री स्टॅलिन यांसंगीतकार इलायराजा यांचा सन्मान करताना संगीत क्षेत्रातील क्रांतीकारक म्हटले आहे. स्टॅलिन लिहितात, ते वाद्य वाजवत नाहीत तर आपल्या हृदयाची काळजी घेतात. स्टॅलिन म्हणाले की त्यांचे वडील आणि दिवंगत डीएमके अध्यक्ष एम करुणानिधी यांनी इलयाराजा यांच्या संगीतातील बारकावेंचे मनापासून कौतुक केले होते आणि त्यांना 'इसाग्नानी' म्हणून गौरवले होते. या शब्दाचा अर्थ संगीतातील ऋषी असा होता.
अभिनेता-राजकारणी कमल हसन यांनी ट्विटरवर आपल्या आपले ज्येष्ट बंधू मानत इलायराजा यांना संगीत्याच्या विश्वातील सम्राट म्हटले आहे. मक्कल नीधी मैयाम (MNM) या राकीय पक्षाचे संस्थापक असलेल्या कमल हासन यांनी दोघांचे थ्रोबॅक ब्लॅक-अँड-व्हाइट फोटो देखील शेअर केला. इलायराजा यांना शुभेच्छा देण्यासाठी असंख्य चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत.
मुख्यमंत्री आणि हसन यांच्यासह इतर अनेकांनी देखील चित्रपट निर्माते दिग्दर्शक मणिरत्नम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्टॅलिन म्हणाले की, रत्नम हे देशातील सर्वश्रेष्ठ सिनेमा दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवणारे आणखी चित्रपट बनवत राहावेत, अशी त्यांची इच्छा आहे. मणिरत्नम यांच्या लेटेस्ट रिलीज झालेल्या दोन भागांच्या पोनियिन सेल्वनला समीक्षकांची प्रशंसा आणि व्यावसायिक यश दोन्ही मिळाले आहे.