मुंबई :बिग बॉस ओटीटी सीजन 2 बद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. या सीजनला 17 जूनपासुन सुरूवात झाली. जियो सिनेमाकडून बिग बॉस ओटीटीचा एक प्रोमो इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये बिग बॉस सर्व घरातील सदस्यांना बजेटिंगबद्दल माहिती देताना दिसत आहे. आगामी भागाच्या प्रोमोमध्ये स्पर्धक त्यांच्या बजेटमध्ये समाविष्ट केलेल्या रकमेत कोणत्या प्रकारच्या वस्तू खरेदी करू शकतात हे या प्रोमेमध्ये सांगण्यात येत आहे. या प्रोमोत स्पर्धक त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूवर चर्चा करतात करताना दिसत आहे.
बिग बॉस ओटीटी सीजन 2 : या प्रोमोमध्ये काही सेलेब्रिटी कॉफाची गरज असल्याचे म्हणत आहे, तर काहीजण चिकन गरजेचे असल्याचे म्हणत आहे. बिग बॉसच्या घरात बजेट मर्यादित असल्याने यावर जास्त चर्चा होताना दिसत आहे. स्पर्धकांना चिकन आणि कॉफी यापैकी एक निवडणे फार कठीण झाले आहे कारण प्रत्येक स्पर्धकाला या दोन्ही गोष्टी आवडतात. पलक पुरस्वानी हिला कॉफी हवी होती. कॉफी तिच्यासाठी गरजेची आहे असे तिने जाहीर केले. याशिवाय पूजा भट्टला मात्र चिकन हवे होते. ज्यामुळे शाब्दिक भांडण झाले. पुजाने असा युक्तिवाद केला की कॉफीच्या तुलनेत चिकनमध्ये पौष्टिक असते. त्यानंतर काहीजणांना तिची गोष्ट पटली.