मुंबई - Bigg Boss 17 :टीव्हीचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा 17वा सीझन रविवारपासून सुरू झाला आहे. 16 ऑक्टोबर रोजी प्रीमियर झाल्यानंतर, शोचा पहिला भाग सोमवार 17 ऑक्टोबर रोजी कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर प्रसारित झाला. पहिल्या एपिसोडपासूनच अनेक खेळाडूंनी प्रेक्षकांचं आणि बिग बॉसचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. बिग बॉसमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन स्पर्धक म्हणून आले आहेत. या दोघांनी शोमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा येताना दिसत आहे. दरम्यान अंकितानं आता शोमध्ये बेबी प्लॅनिंगबाबत आता खुलासा केला आहे.
अंकिता लोखंडे बेबी प्लॅनिंगबाबत बोलली : अंकिता म्हटलं की, यावर्षी या शोचा भाग ती बनली कारण, पुढच्या वर्षी ती आणि विकी बेबी प्लॅनिंग करेल. या आनंदाच्या बातमीमुळे अंकिताचे चाहते खूप खुश झाले आहेत. आता सध्या 'बिग बॉस'मध्ये सर्वांची आवडती जोडी ही अंकिता आणि विकीची असल्यानं हा शो ते जिंकू शकतात असा अंदाजा लावला जातोय.
सनी आर्याच्या पत्नीनं केला व्हिडिओ पोस्ट : बिग बॉसच्या घरात स्पर्धक सध्या एकमेकांना जाणून घेण्याच्या प्रयत्न करत आहेत. 'बिग बॉस 17'मध्ये ईशा मालवीय विकीला तिचा 'भाऊ' मानत आहे. याशिवाय तहलका भाई उर्फ सनीनेही काही जवळचे नाते निर्माण करण्यावर भर देत आहे. तो मन्नारा चोप्रा आणि अंकिता लोखंडे यांना कपडे भेट देताना दिसत आहे. ही व्हिडिओ क्लिप पाहून त्याची पत्नी नाखुश आहे. सनी आर्याच्या पत्नीनं तिच्या चॅनेलवर तिच्या पती एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या क्लिपमध्ये तहलका भाई मुलींसोबत बॉन्डिंग बनविण्यासाठी त्यांना कपडे भेट देताना दिसत आहेत.
तहलकाच्या पत्नीला राग आला :त्याच्या पत्नीनं म्हटलं की, 'तो आता खूप करत आहे, तो मला त्याचे कपडेही घरी देत नाही,' असं तिनं व्लॉगमध्ये सांगितलं आहे. तो आपले महागडे कपडे घरातील प्रत्येक मुलीला देत आहे. मी त्याला यासाठी पाठवले नाही. त्याला काय वाटते की तो दुकानदार आहे, तो प्रत्येकाला त्याचे कपडे का देतोय, मला समजत नाही? माझे काम झाले, मी आता घर सोडते.'
बिग बॉस घरात झाला जोरदार डान्स : घरातील नियम आणि नियमांसोबतच बिग बॉसच्या घरातील गाणेही रोज बदलतात. बिग बॉसच्या घरात घरातील सदस्य हे गाण्यावर नाचताना दिसले. याशिवाय ईशा आणि अभिषेकबाबत घरातील सदस्यांमध्ये विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वरवर पाहता, घरातील सदस्य दोघांमधील मतभेदाचा फायदा घेऊ शकतात असं सध्या दिसत आहे. घरातील कोणती जबाबदारी कोण पार पाडणार यावरून आतापासूनच कुरबुरी सुरू झाली आहे. या गोष्टींवर मुनावर फारुकी लक्ष ठेवत आहे.
ईशा आणि मन्नारा एकमेकांना भिडतात :एपिसोडच्या शेवटी मन्नारा आणि ईशाचे भांडण होतं. दोघीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत होत्या. या सीझनमध्ये मुनावर फारुकी, अंकिता लोखंडे, विक्की जैन, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, ईशा मालवीय, मन्नारा चोप्रा, नवीद सोले, अनुराग डोवाल, सना रईस खान, जिग्ना वोरा, सोनिया बन्सल, खानजादी, सनी आर्या. , रिंकू धवन. अरुण मशेट्टी आणि अभिषेक कुमार स्पर्धक म्हणून सामील झाले आहेत.
हेही वाचा :
- Allu Arjun receives grand welcome : अल्लु अर्जुनचं हैदराबादमध्ये जंगी स्वागत, ढोल ताशांसह फटाक्यांची आतषबाजी
- LEO Advance Booking : थलपथी विजयच्या 'लिओ'नं वाजला डंका; जागतिक अॅडव्हान्स बुकिंग 200 कोटीच्या जवळपास
- Mehreen Pirzada : वैवाहिक बलात्कारच्या सीनमुळे मेहरीन पिरजादा ट्रोल; दिलं सडेतोड उत्तर...