मुंबई - Bigg Boss 17 :बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचा रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या 17व्या सीझनचा पहिला वीकेंड खूपच धमाकेदार असणार आहे. 'बिग बॉस'च्या 17व्या सीझनमध्ये अनेक सेलेब्रिटी सध्या हजेरी लावत आहेत. दरम्यान आता सोशल मीडियावर सलमान खान आणि कंगना राणौतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान कंगनासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. याशिवाय व्हिडिओमध्ये कंगना रणौत सलमान खानला त्यांचे फ्लर्टिंग कौशल्य दाखविण्यास सांगताना दिसत आहे .'बिग बॉस 17' मध्ये कंगाना ही आगामी 'तेजस' चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसेल. कंगाना राणौत ही वीकेंड का वारमध्ये सलमान खानसोबत खूप धमाल करताना दिसणार आहे.
सलमान खान-कंगना राणौतची अप्रतिम केमिस्ट्री : 'बिग बॉस 17'च्या नवीन प्रोमोमध्ये सलमान खान आणि कंगना रणौत यांच्यात जबरदस्त केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळत आहे. सलमाननं कंगनाला प्रश्न केला की, 'तुमचा को-स्टार तुमच्यासोबत फ्लर्ट करत असेल तर , त्यानंतर कंगना यावर म्हटलं. जर तो तुमच्यासारखा देखणा असेल तर ती मनापासून विचार करेल.' यानंतर कंगनाही सलमानला तिच्यासोबत फ्लर्ट करण्यास सांगते. सलमान हा तिच्यासोबत फ्लर्ट करतो. त्यानंतर तो म्हणतो, 'तू खूप सुंदर दिसत आहेस, पुढची 10 वर्ष तू काय करणार आहे? त्यानंतर दोघेही हसतात. या शो दरम्यान सलमान आणि कंगना खूप मस्ती केली.