मुंबई - Bigg Boss 17:'बिग बॉस 17' हा शो सध्या खूप चर्चेत आहे. सर्व स्पर्धक प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत आहेत. या शोमधील स्पर्धक आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहेत. गुरुवारच्या एपिसोडमध्ये करवा चौथ स्पेशल दाखवण्यात येणार आहे. अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा आपल्या पतीसाठी करवा चौथचा उपवास करणार आहेत. दरम्यान अभिनेत्री मन्नारा चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मन्नारा रडताना दिसत आहे. घरातील सर्व सदस्य तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडिओमध्ये घरातील सर्व सदस्य तिला समजवत आहेत.
मन्नारा चोप्रा का दुखावली? : व्हिडिओमध्ये मन्नारा म्हणते की, 'बिग बॉस मला कन्फेशन रूममध्ये यावे लागेल आणि मला या शोमधून बाहेर पडावे लागेल. यावेळी ती खूपच भावूक दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कलर्स पेजवर लिहलं गेलं, 'मन्नाराचे डोळे भरून आले आहेत, तिला कोणी दुखावले?' मन्नाराबद्दल बोलायचं झालं तर तिनं साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्राची चुलत बहीण आहे. जेव्हापासून मन्नारानं बिग बॉसच्या घरात एंट्री केला आहे, तेव्हापासून ती तिच्या बबली शैलीनं चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या शोमध्ये मन्नारा आणि मुनावर यांच्यात चांगली बॉन्डिंग पाहायला मिळत आहे.