मुंबई - बिग बॉस 17 सुरू झाल्यापासून त्यात घडणारे नाट्य प्रेक्षकांची भरपूर करमणूक करणारं आहे. कार्यक्रमाचा 51 व्या भागात अशाच अनेक घटना घडल्या. ज्यामुळे स्पर्धक बरेच अस्वस्थ झाले आणि प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. या भागात नॉमिनेशन्स उघड झाल्यानंतर दिल, दिमाग आणि दम घरे विसर्जित झाली. या घोषणेनंतर समर्थ जुरेलनं अंकिता लोखंडेवर आपला राग काढला. यामुळे ती भावूक झाल्याचं दिसलं. मन्नारा चोप्रा आणि समर्थ यांच्यातल्या गॉसिपच्या चर्चेत दोघंही अभिषेक कुमार आणि खानजादी यांच्या प्रेमाच्या अँगलवर चर्चा करताना दिसले.
8 स्पर्धकांचं या आठवड्यात नॉमिनेशन
बिग बॉस 17 च्या रिअॅलिटी शोमध्ये नॉमिनेशन प्रक्रिया सोमवारच्या एपिसोडमध्ये पार पडली. बिग बॉसनं सांगितलं की, ज्या उमेदवाराला घरातून काढून टाकायचं आहे त्याच्यावर कॉफी टाकावी. नॉमिनेशन टास्क दरम्यान बऱ्याच उलथापालथी घडल्या. यामध्ये घरातील अर्ध्या स्पर्धकांना यामध्ये नॉमिनेशनला सामोरं जावं लागलं. टास्कच्या अखेरीस मुनावर फारुकी, विकी जैन, अभिषेक कुमार, खानजादी, अनुराग डोभाल, नील भट्ट, अरुण महाशेट्टी आणि सना रईस खान यांना या आठवड्यात घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धक म्हणून नॉमिनेशन मिळाले.
समर्थ जुरेल, अभिषेक कुमार खानजादीसोबत फ्लर्ट करताना मन्नारा चोप्रा
मागील एपिसोड्समध्ये अभिषेक कुमारसोबत चांगलं सूत जमलेला समर्थ जुरेल बिग बॉसच्या सोमवारच्या भागात त्याच्या विरोधात गेला. खानजादी आणि अभिषेक एकत्र आराम आणि मजा मस्ती करत असताना मन्नारा चोप्रा, समर्थ आणि मुनावर फारुकी त्यांच्या संदर्भात 'सडकछाप अॅक्टींग' करणारे म्हटलं तर मन्नारनंही त्याला कमी लेखलं. खानजादीने जेव्हापासून अभिषेक कुमारला माफी दिली तेव्हापासून सर्वांच्या नजरा त्यांच्यावर; खिळल्या आहेत. सर्वजण अभिषेकबद्दल बोलत आहेत. उत्तर देताना समर्थ म्हणाला, "अॅक्टींग तो सही, क्या सडकछाप अॅक्टींग हो रही है." त्याला प्रतिसाद देताना मन्नारानं अभिषेकची खिल्ली उडवताना म्हटलं, "सडकछाप लगते है." मग ते अभिषेकलाच फक्त गेमबद्दलच्या काही गोष्टी कशा माहिती आहेत यावर चर्चा करतात. समर्थ म्हणाला, ''इसको कुछ आता ही नहीं इसको सिर्फ लडना आता है, हाँ मैं बेहस कर लूँ 2-3 दिन ऑर दिख जाऊंगा."