महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' च्या ग्रँड प्रीमियरची दमदार सुरुवात, जाणून घ्या कोण आहेत नवे स्पर्धक - ग्रँड प्रीमियर

Bigg Boss 17 : अभिनेता सलमान खानचा बिग बॉसचा 17वा नवा सीझन सुरू झाला आहे.या सीझनची प्रत्येकजण आतुरतेने पाहत होते. आता या शोमध्ये कोण दिसेल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 12:20 PM IST

मुंबई - Bigg Boss 17 : अभिनेता सलमान खान बिग बॉसचा नवा सीझन घेऊन आला आहे. बिग बॉसचा सीझन 17वा रविवारी रात्री 9 वाजता सुरू झाला आहे. या शोमध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, मन्नारा चोप्रा, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, जिग्ना वोरा, मुनव्वर फारूकी, नाविद सोले, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, अनुराग डोभाल, सना रईस खान, सोनिया बंसल, खानजादी, सनी आर्या, रिंकू धवन आणि अरुण महाशेट्टी या स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. यावेळी टीव्हीच्या सर्वात मोठ्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेक गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. 'बिग बॉस 17'च्या प्रोमोमध्ये बिग बॉस घरातील काही सदस्यांची बाजू घेताना दिसला आहे.

  • अंकिता लोखंडे आणि विकी जैन: बिग बॉस 17 च्या स्पर्धकांच्या यादीतील पहिले नाव म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन आहे. बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरमध्ये या जोडप्याची झलक सोशल मीडियावर दाखविण्यात आली. हे दोघेही बिग बॉसच्या घरात चांगलीच जादू करणार असं सध्या दिसत आहे.
  • ईशा मालवीय: बिग बॉस 17च्या स्पर्धकांच्या यादीतील दुसरे नाव अभिनेत्री ईशा मालवीयाचे आहे. 20 वर्षीय ईशा मालवीय एक अभिनेत्री, मॉडेल आणि फॅशन इन्फ्लुएंसर आहे. ईशाची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. 2020 मध्ये ईशा बी प्राकच्या 'जिसके लिए' गाण्यात दिसली होती. त्यानंतर तिनं 2021 मध्ये 'उदारियां' या टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
  • मन्नारा चोप्रा: बिग बॉस या सीझनमध्ये तिसऱ्या स्पर्धकाचे नाव आहे मन्नारा चोप्राचं आहे. मन्नारा चोप्रा ही एक साऊथ अभिनेत्री आहे. मन्नारानं तेलुगूसोबतच तमिळ आणि बॉलिवूडमध्येही काम केले आहे. मन्नाराचा बॉलीवूड डेब्यू चित्रपट 'जिद' हा 2014 रोजी प्रदर्शित झाला होता. मन्नारा ही प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांची चुलत बहीण आहे.
  • अभिषेक कुमार: बिग बॉसच्या 17व्या सीझनमधील चौथे नाव म्हणजे अभिनेता अभिषेक कुमारचे आहे. ईशा मालवीयप्रमाणेच अभिषेकने देखील टीव्ही शो 'उदारियां'मधून प्रसिद्धी मिळाली. तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. अभिषेकनं नोरा फतेही, सरगुन मेहता आणि उर्वशी रौतेला यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत रील्स केले आहेत. याशिवाय तो टीव्ही शो 'बेकाबू'मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसला आहे. सध्या अभिषेकचे नाव ईशासोबत जोडले गेले आहे. अभिषेक कुमारचे खरे नाव अभिषेक पांडे आहे.
  • जिग्ना वोरा: बिग बॉस 17च्या स्पर्धकांच्या यादीतील पाचवे नाव जिग्ना वोराचं आहे. जिग्ना ही क्राईम रिपोर्टर आहे. 2011 मध्ये पत्रकार ज्योतिर्मय यांच्या हत्येप्रकरणी जिग्नाचे नाव पुढे आले होते, त्यानंतर तिला 6 वर्षांची शिक्षा झाली होती. जिग्नावर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याचा आरोप केला गेला आहे. बिग बॉसमध्ये जिग्नाच्या प्रवेशामुळे अनेक मोठ्या गोष्टीचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
  • मुनावर फारुकी: बिग बॉसच्या या यादीमध्ये मुनावर फारुकीच्या नावचा समावेश आहे. मुनावर हा स्टँडअप कॉमेडियन आहे. यापूर्वी त्यांच्या बाबतीत अनेक वाद झाले आहेत. मुनावरचे चाहते त्याला बिग बॉस 17 मध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. सध्या मुनावर फारुकी हे नाव ट्विटरवर ट्रेंड होत आहे. बिग बॉस 17 च्या आधी मुनावर 2022 मध्ये कंगना रणौतच्या शो 'लॉकअप' मध्ये देखील दिसला होता. या शोचा तो विजयी ठरला होता.
  • नाविद सोले:बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरमध्ये दिसलेल्या स्पर्धकांच्या यादीतील पुढचे नाव नाविद सोलेचे आहे. नाविद हा व्यवसायाने फार्मासिस्ट आहे आणि यासोबतच तो सोशल मीडियावर भरपूर कंटेंटही तयार करतो. नाविदचे इन्स्टाग्रामवर 90 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. नाविद यापूर्वी बीबीसीच्या रिअ‍ॅलिटी शो 'द अप्रेंटिस'मध्येही दिसला होता.
  • ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट : या शोमध्ये नील आणि ऐश्वर्या हे जोडीमध्ये येत आहे. दोघेही 'गम है किसी के प्यार' या मालिकेत दिसले आहेत. चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते. ऐश्वर्या नुकतीच 'खतरों के खिलाडी 13' मध्ये दिसली होती. ती टॉप 3 मध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरली. नील 'ये है आशिकी' आणि 'लाल इश्क' या मालिकेत दिसला आहे.
  • बाबू भैया उर्फ ​अनुराग डोवाल: प्रसिद्ध यूट्यूबर अनुराग डोवाल बिग बॉस 17मध्ये स्पर्धक आहेत. सोशल मीडियावर त्याची जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे. त्यानं आपल्या चाहत्यांचे नाव ब्रो सेना असे ठेवले आहे. बाबू भैय्याचे यूट्यूबवर 7 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
  • सना रईस खान: वकील सना रईस खान ही बिग बॉस 17 स्पर्धक आहे. सना अनेक हायप्रोफाईल केसमध्ये सहभागी झाली आहे . तिनं बिग बॉसमध्ये जिग्ना वोरासोबत प्रवेश केला.
  • सोनिया बन्सल:सोनिया बन्सलनं बिग बॉस सीझन 17 मध्ये प्रवेश केला आहे. सोनियानं हिंदीशिवाय तेलुगू चित्रपटही काम केले आहेत.
  • खानजादी:रॅपर आणि गीतकार खानजादी एमटीव्हीवर 'हसल 2.0'मध्ये दिसली आहे. तिचे खरे नाव फिरोझा खान आहे.
  • सनी आर्य: कॉमेडियन आणि यूट्यूबर सनी आर्य हा दिल्लीचा रहिवासी आहे. त्याचे 'तहलका प्रँक' हे यूट्यूब चॅनल आहे. त्यांचे 15 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
  • रिंकू धवन : टीव्ही इंडस्ट्रीत 3 दशकांपासून सक्रिय असलेल्या रिंकू धवननं बिग बॉस 17मध्ये एन्ट्री घेतली आहे. तिनं 'ये वादा रहा', 'गुप्ता ब्रदर्स' आणि 'ना बोले तुम ना मैं कुछ कहा' या मालिकांमध्ये काम केले आहे.
  • अरुण महाशेट्टी: गेमर अरुण महाशेट्टी हा बिग बॉस शोचा पुढचा स्पर्धक आहे. अरुण आणि रिंकूनं एकत्र प्रवेश केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details