मुंबई - Haanji song out : 'थँक यू फॉर कमिंग' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या निर्मात्यांनी अखेर मंगळवारी चित्रपटामधील 'हांजी' नावाचं पहिलं ट्रॅक प्रदर्शित केलं आहे. हा चित्रपट कॉमेडी असणार आहे. 'थँक यू फॉर कमिंग' चित्रपटात मुख्य भूमिकेत भूमी पेडणेकर, शहनाज गिल, कुशा कपिला, डॉली सिंग आणि शिबानी बेदी हे कलाकार असणार आहेत. भूमी पेडणेकरनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'हांजी' गाण्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलं, रॅगर टाकण्याची वेळ आली आहे? हांजी! हे गाणं सारेगामा म्युझिक, यूट्यूब चॅनल आणि इतर सर्व प्रमुख ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर! आता पूर्ण व्हिडिओ पहा! असं तिनं लिहलं आहे.
'थँक यू फॉर कमिंग'मधील पहिलं ट्रॅक :गाण्याची ही पोस्ट शेअर करताच या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहे. एका यूजरनं या पोस्टवर लिहलं, 'लव्ह यू शहनाज' तर दुसऱ्या एका यूजरनं लिहलं, 'या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे'. आणखी एकानं लिहलं, खूप जबरदस्त गाणं आहे. अशा अनेक कमेंट या गाण्यावर येत आहेत. काही चाहत्यांनी या गाण्याच्या पोस्टमध्ये लाल हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केले आहेत. 'हांजी' गाण्यात भूमी आणि शहनाज कौर गिल या जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. बाकी अभिनेत्री देखील या गाण्यात डान्स करत आहे. याशिवाय या गाण्यात करण कुंद्राची झलकदेखील दाखविण्यात आली आहे.