महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Bhumi Pednekar on male co stars : पुरुष कलाकारांसोबत काम करताना दुय्यम असल्याचं वाटतं, भूमी पेडणेकरचं विधान - थँक यू फॉर कमिंग बॉक्स ऑफिस

Bhumi Pednekar on male co stars : 'थँक यू फॉर कमिंग' हा चित्रपट पूर्णतः महिला केंद्रीत आहे. यामध्ये भूमी पेडणेकर शिवाय शहनाज गिल, डॉली सिंग, शिबानी बेदी आणि कुशा कपिला या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका आहेत. महिला कलाकारांसोबत काम करणं आणि पुरुष सहकलाकारांसोबत काम करण्यातील फरक भूमी पेडणेकरनं सांगितला आहे.

Bhumi Pednekar on male co stars
भूमी पेडणेकरचं विधान

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 4:45 PM IST

मुंबई - Bhumi Pednekar on male co stars : अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या 'थँक यू फॉर कमिंग' या अलिकडजेच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. भूमी शिवाय या चित्रपटात शहनाज गिल, डॉली सिंग, शिबानी बेदी आणि कुशा कपिला या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका आहेत. यासाठी सर्व महिलांनी एकत्र शुटिंगचा आनंद घेतला होता. महिला कालाकारांसोबत काम करणं आणि पुरुष कलाकारांसोबत काम करणं, यात नेमकी काय तफावत आहे यावर भूमी पेडणेकरनं आपलं भाष्य केलं आहे.

भूमी पेडणेकरने एका मुलाखतीत कबूल केलं की जेव्हा ती पुरुष सह-कलाकारांसोबत चित्रपटांमध्ये दिसली तेव्हा ती अनेकदा दुय्यम असल्यासारखी वाटते. भूमी म्हणाली की, 'पूर्वीच्या चित्रपटांमध्ये पुरुष सहकलाकार अधिक चांगले असतात असा नेहमीच समज होता. तुम्ही कुठेही असू शकता आणि काहीही करू शकता, असं असलं तरीही मला नेहमीच कमीपणा वाटतो. थँक यू फॉर कमिंग, आम्ही सर्व एकाच पायावर आहोत, जे कधीही (पुरुष लीड असताना) शक्य झालेलं नाही,' अशी भूमीनं कमेंट केली आहे.

भूमीच्या म्हणण्यानुसार तिला शुटिंग दरम्यान संरक्षित आणि सुरक्षित वाटले आणि अतिरिक्त प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तिला त्रासदायक वाटले नाही. तिनं असाही दावा केला की, 'थँक यू फॉर कमिंग चित्रपटाच्या सेटवर सर्व महिलांना बोलण्यासाठी, एकमेकांना आधार देण्यासाठी, हसण्यासाठी, रडण्यासाठी, कसंही व्यक्त होण्यासाठी खास जागा देण्यात आली होती. सध्या, मी खरोखरच जगण्याचा प्रयत्न करतेय, आणि मी या सहकारी महिलांच्या पाठिंब्याचं खूप कौतुक करते. सध्या आम्ही आमचे सर्व प्रयत्न लोकांना चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दिशेनं करत आहोत. या प्रकराची चळवळ वाढावी अशी आमची इच्छा आहे', असे भूमी पुढे म्हणाली.

करण बुलानी दिग्दर्शित यांनी दिग्दर्शित केलेला 'थँक यू फॉर कमिंग' हा चित्रपट हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड आणि अनिल कपूर फिल्म कम्युनिकेशन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. एका अनोख्या विषयावरील स्त्री केंद्रीत कथानक असलेला चित्रपट पाहून केवळ महिलाच नाहीत तर पुरूषही दाद देताना दिसत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details