मुंबई - कॉमेडियन भारती सिंग, तिचा पती हर्ष लिंबाचिया आणि त्यांचा मुलगा गोल ( ज्याचे खरे नाव लक्ष लिंबाचिया आहे ) बिग बॉस 16 च्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहेत. यात ते बॉलिवूड स्टार सलमान खानसोबत स्टेज शेअर करताना दिसणार आहेत.
स्टेजवर आल्यानंतर, भारती सलमान खानचे वचन आठवते: "सारे वादे याद है सलमान भाई के. इन्होने कहा था की इंके बचे को में लॉन्च करूंगा. पुढे जाऊन भारती तिचा मुलगा लक्षला स्टेजवर आणते आणि सलमानकडे देते. बराच वेळ कडेवर घेतल्याने त्रास होतोय असे म्हणून ती मुलाला सलमानकडे देते. सलमानही बाळाला आपल्या कडेवर घेतो.
सलमान म्हणतो, "साहजिकच थकोगी यार...नंतर, सलमान त्याचे ट्रेडमार्क चांदीचे ब्रेसलेट आणि हर्षला विशेष लोहरी भेट देतो. भारती नंतर सलमानने त्याचे पनवेल फार्महाऊस रिकामे केल्याबद्दल विनोद केला कारण त्याने फार्महाऊस तिचा मुलगा लक्षकडे हस्तांतरित केला आहे, असे भारती म्हणताच सलमान हसायला लागतो.
होस्ट सलमानशी बोलल्यानंतर, भारती आणि हर्ष लक्षला सलमानसोबत सोडतात आणि ते सर्व स्पर्धकांना भेटण्यासाठी बिग बॉस 16 च्या घरात जातात. भारती नंतर सांगते की साजिद खान आणि अब्दू रोजिक यांच्या पहिल्या महिन्याच्या मैत्रीबद्दल बाहेरचे सर्वजण गोंधळले होते.