मुंबई : बिग बॉस ओटीटी २ हा वादग्रस्त शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या शोमध्ये सायरस ब्रोचाने बिग बॉसचे घर सोडले आहे. सायरसने याआधीच घर सोडण्याची कल्पना ही अभिनेता सलमान खानला दिली होती. सलमानला शो सोडण्याचे कारण सांगत त्याने सांगितले होते की, त्याने बऱ्याच दिवसांपासून काही खाल्लेल नाही, यामुळे त्याचे वजन कमी होत आहे. याशिवाय त्याला या घरात झोप लागत नाही. मात्र सायरसचे त्यावेळी कोणीही ऐकले नाही. याप्रकरणी सलमान खानचे त्याचे मन वळवून त्याला शोच्या कराराचा हवाला देऊन शो सोडण्यास मनाई केली होती, मात्र आता त्याने कराराची पर्वा न करता शो सोडला आहे.
बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन झाले नाही : विशेष म्हणजे या आठवड्यात कोणतेही एलिमिनेशन झाले नाही. सायरसने सलमान खानसमोर हात जोडले आणि त्याला घरी जायचे आहे हे सांगितले होते. दरम्यान सायरसने घर सोडल्यामुळे, त्याचे चाहते हैराण झाले आहेत. घर सोडण्यामागील काय कारण असू शकते हे जाणून घेण्यास प्रेक्षक फार उत्सुक आहेत. दरम्यान बिग बॉस ओटीटी फक्त एक महिन्यासाठी स्ट्रीमिंग होणार होते, मात्र आता शोचा वाढता टीआरपी पाहता, शो आणखी दोन आठवडे वाढवण्यात आला आहे.
सायरसने घर का सोडले? : सायरसने या शोमध्ये सलमानला आधीच सांगितले होती की, त्याच्या तब्यतीमुळे आणि घरगुती समस्यांमुळे तो शो सोडू इच्छितो. या शोसोबत सायरसचा तीन आठवड्यांचा करार होता. दरम्यान सायरसच्या नातेवाईकांनी शोच्या निर्मात्यांना विनंती केली होती. सायरस शोमधून बाहेर पाठविण्यात यावे त्यानंतर ही गोष्टी घडल्या.