मुंबई :वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा 'बवाल' चित्रपटाचा टीझर ५ जुलै रोजी बुधवारी रिलीज झाला आहे. याचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे. वरुण आणि जान्हवीचा पहिलाच सोबत चित्रपट आहे. हा एक रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचा टीझर हा दुपारी १२ वाजता प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे शूटिंग जगातील विविध देशांमध्ये झालेली आहे. 'बवाल' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिलाच चित्रपट असणार आहे, ज्याचे प्रीमियर पॅरिसमधील आयफेल टॉवरवर होणार आहे. दरम्यान हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार नाही परंतु २०० हून अधिक देशांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.
कसा आहे टीझर: वरुण आणि जान्हवीच्या चित्रपटाचा टीझर हा ड्रामा आणि प्रेमाने भरलेला आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडमध्ये सॅड गाणेही ऐकू येत आहे. टीझरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट २१ जुलै रोजी प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.
'छिछोरे'नंतर नितेश आणि साजिद पुन्हा एकत्र : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'छिछोरे' चित्रपटानंतर नितेश तिवारी आणि साजिद पुन्हा एकदा या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. आधी हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र आता हा चित्रपट २१ जुलै रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.