मुंबई - मनोज बाजपेयीची मुख्य भूमिका असलेल्या कोर्टरूम ड्रामा 'सिर्फ एक बंदा काफी है' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची कथा दीपक किंगराणी यांनी लिहिले आहे. ही कथा एका सामान्य व्यक्ती असलेल्या उच्च न्यायालयातील वकिलाची आहे. हा वकिल पोस्को ( POCSO ) कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराचा एक विलक्षण खटला एकट्याने लढवतो.
ट्रेलरची लिंक शेअर करताना मनोज बाजपेयीने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'एक सामान्य माणूस. एक देव माणूस आणि एक असाधारण केस. सिर्फ एक बंदा काफी है प्रीमियर 23 मे रोजी झी ५ वर होणार. देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या खटल्याचा साक्षीदार व्हा.'
'सिर्फ एक बंदा काफी है मधील पी.सी. सोलंकीची भूमिका साकारणे हा एक अविश्वसनीय अनुभव होता. त्याचे कारण असे की, ही एका सामान्य माणसाची प्रेरणादायी कथा आहे ज्याने सत्य आणि न्यायासाठी सर्व अडचणींविरुद्ध विलक्षण खटला लढला. आज ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मला आशा आहे की ही कथा प्रेक्षकांना आवाहन करते आहे आणि विजयाच्या या कथेचे साक्षीदार होण्यास भाग पाडते'. असे मनोज वाजपेयीने सांगितले.