महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

BaiPan Bhari Deva Box Office Collection 18 : मराठी चित्रपटसृष्टीतील 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने रचला इतिहास... - चित्रपटाने केलेली कमाई

'बाईपण भारी देवा' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर खूप धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटचने ५० कोटीचा आकडा पार करून मराठी चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला आहे.

BaiPan Bhari Deva
बाईपण भारी देवा

By

Published : Jul 18, 2023, 12:01 PM IST

मुंबई :'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची सध्या खूप चर्चा सुरू आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप वेगाने कमाई करताना दिसत आहे. तब्बल ५ कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ५३.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथानक प्रेक्षकांच्या पसंतीला खूप उतरले आहे. चित्रपटाचा क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घातल आहे. खूप दिवसानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपटने इतक्या वेगाने कमाई केली आहे. हिंदी सिनेमांच्या तुलनेत मराठी चित्रपटाचे फारच कमी बजट असते त्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिस खूप चांगली कामगिरी केली आहे.

चित्रपटाने केलेली कमाई :१८व्या दिवशी या चित्रपटाने सोमवार २.२५ कोटीची कमाई केली होती. केदार शिंदेंनी दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यत एकूण ५३.१० कोटीची कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाने १७व्या दिवशी ५० कोटीचा आकडा पार केला होती. त्यामुळे या चित्रपटाबाबत काल सोशल मीडियावर फार चर्चा झाली. आताही या चित्रपटाबाबत असे बोलले जात आहे, की काही दिवसात हा चित्रपट १०० कोटीच्या कल्बमध्ये जाऊ शकतो, असे झाल्यास हा मराठी चित्रपट रूपेरी पडद्यावर एक इतिहास रचेल. सोमवार, १७ जुलै २०२३ रोजी 'बाईपण भारी देवा'ने एकूण २७.२२% व्यवसाय केला. चित्रपटाला बघण्यासाठी खूप प्रमाणामध्ये महिलावर्ग जात आहे. या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्रींनी काम केले आहे. रूपेरी पडद्यावर या अभिनेत्री आपली जादू चालवत आहे.

सैराटचा रेकॉर्ड मोडणार का? : नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ८५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर अद्यापही कोणत्या मराठी चित्रपटाने हा रेकॉर्ड मोडला नाही. त्यामुळे हा चित्रपट सैराटचा रेकॉर्ड मोडू शकले का ? आता याबद्दल प्रेक्षक फार उत्सुक आहे. काही महिन्यांपूर्वी वेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७५ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या चित्रपटावर आहे.

हेही वाचा :

  1. Aamir Ali And Shamita Shetty : शमिता शेट्टीला डेट करत असल्याच्या अफवांवर आमिर अलीने मौन सोडले...
  2. Ranveer Singh : रणवीर सिंग उर्फ रॉकी रंधावाचा शर्टलेस अवतार...
  3. Project K on Time Square Billboard : न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकली 'प्रोजेक्ट के'ची जाहिरात, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details