मुंबई : 'बाई पण भारी देवा' चित्रपट रूपेरी पडद्यावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. अवघ्या ५ कोटीचा बजेट असलेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ५०.८५ कोटीची एकूण कमाई केली आहे. चित्रपटात कलाकारांनी खूप दमदार अभिनय केला आहे. चित्रपटातील संवाद प्रेक्षकांना खिळवून टाकणारे आहेत. त्यामुळे चित्रपट पाहायला प्रेक्षकांची झुंब्बड उडाली आहे. केदार शिंदे यांचा 'बाईपण भारी देवा' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, दीपा परब आणि शिल्पा नवलकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
चित्रपटाचे एकूण कलेक्शन :'बाईपण भारी देवा' चित्रपटाने १४ व्या दिवशी २.५० कोटीची कमाई केली होती. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईचा एकूण आकडा ३७.३५ कोटी इतका गेला होता. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत आणखी वेग आला आहे. वीकेंडच्या रविवारी या चित्रपटाने ५.७५ कोटीचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे आता चित्रपटाचे एकूण कलेक्शन ५०.८५ कोटी इतके झाले आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ६.१६ कोटीचे कलेक्शन केले होते. या चित्रपटाने आता मराठी चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कलेक्शन करणारा हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलाच आहे. सहा महिलांची जादू आता प्रेक्षकांवर चालल आहे. चित्रपट पाहण्यासाठी महिला प्रेक्षक खूप गर्दी करत आहेत.