महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Babil Khan : इरफान खानच्या मुलाने 'स्टार किड' असण्याचं नाकारलं ; म्हणाला वडिलांमुळं मिळतो विशेषाधिकार... - Irrfan s son

Babil Khan News : अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खाननं 'स्टार किड' असण्याचं नाकारलं. बाबिलनं यादरम्यान त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल देखील सांगितलं. लवकरच तो यशराज फिल्म्स निर्मित वेब सीरीजमध्ये दिसणार आहे.

Babil Khan
बाबिल खान

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 5:12 PM IST

मुंबई - Babil Khan News : इरफान खानचा मुलगा बाबिल खान सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फ्रायडे नाईट प्लॅन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'काला' या पहिल्या चित्रपटानंतर बाबिलचा हा दुसरा चित्रपट आहे. दरम्यान बाबिलनं नुकताच एक खुलासा केला आहे. त्यानं सांगितलं की तो एक स्टार किड नाही. त्याच्या वडिलांची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा केली जात असली तरी, त्याला इंडस्ट्रीमध्ये 'स्टार' मानलं जात नाही. अलीकडील एका प्रमोशनल मुलाखतीत, बाबिल खाननं सांगितले की तो त्याच्या वडिलांच्या उत्कृष्ट कारकीर्दीचे अनुकरण करू इच्छित नाही. त्यानं सिनेसृष्टीतील त्याच्या स्वत: च्या प्रवासाबद्दलदेखील आपला दृष्टीकोन व्यक्त केला. इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करण्यावर त्याचा ठाम विश्वास आहे.

बाबिलने केला खुलासा :नेपोटिझमच्या मुद्यावर बोलताना बाबिलनं म्हटलं मी स्टार किड नाही. माझी परिस्थिती वेगळी आहे. मी इरफान खानचा मुलगा आहे. नेपोटिझम जेव्हा प्रश्न येतो तो माझा ग्रे एरिया आहे. मला चांगल्या भूमिका मिळवायच्या आहेत. भूमिका साकारणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा त्याचा माझ्या आत्मविश्वासावर परिणाम होईल. बाबिलनं पुढं सांगितलं, 'इरफानचा मुलगा असल्यानं मला विशेषाधिकारही मिळतात, जे खूप वेगळे आहेत. गरज असेल तेव्हा मी बाबांच्या मित्रांकडे जाऊ शकतो. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं. हा माझा सर्वात मोठा विशेषाधिकार आहे. मी पंकज त्रिपाठी सरांना फोन करून मला प्रशिक्षण हवं असल्याचं सांगू शकतो.

बाबिलचे आगामी चित्रपट :आगामी काळात बाबिल हा शूजित सरकारच्या पुढच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रॉनी लाहिरी यांनी बँकरोल केला आहे. तसेच त्याकडे यशराज फिल्म्सचा आगामी वेब शो 'द रेल्वे मेन' देखील आहे. बॉलिवूड अभिनेता इरफान खान आता या जगात नाही. परंतु ते त्याच्या चाहत्यांच्या मनात एक सुंदर स्मृती म्हणून कायम जिवंत राहील. बाबिल इंडस्ट्रीत आपले खास स्थान मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बाबिल अनेकदा अवार्ड शोमध्येदेखील दिसतो. याशिवाय बाबिलचा खास चाहतावर्ग आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा तो आपले सुंदर फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

हेही वाचा :

  1. Shahrukh Khan Funny Reply : 'जवान' चित्रपटाबाबत शाहरुख खाननं दिला चाहत्याला सल्ला...
  2. Anurag Kashyap Birthday : अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपनं दिल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...
  3. Atul Kulkarni Birthday : मेहनतीच्या जोरावर अतुल कुलकर्णीनं चित्रपटसृष्टीत कमावलं नाव...

ABOUT THE AUTHOR

...view details