महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 1:13 PM IST

ETV Bharat / entertainment

Ayushmann khurrana : आयुष्मान खुरानानं व्यक्त केली 'ही' इच्छा ; जाणून घ्या...

Ayushman khurana : आयुष्मान खुराना सध्या त्याच्या 'ड्रीम गर्ल 2'मुळं खूप चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला. दरम्यान आता आयुष्मान एका मुलाखतीत आपली इच्छा व्यक्त केली आहे. काय आहे ही इच्छा जाणून घेण्यासाठी वाचा...

Ayushmann khurrana
आयुष्मान खुराना

मुंबई - Ayushman khurana : आयुष्मान खुराना सध्या त्याच्या 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. आयुष्मान हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. आयुष्मानच्या अनेक चित्रपटांचा रिमेक हा साऊथ चित्रपटसृष्टीत बनविण्यात आला आहेत. त्याचा 'विकी डोनर' हा तेलुगूमध्ये 'नरुदा डोनोरुडा' म्हणून रिमेक बनविण्यात आला होता. 'अंधाधुन'चा तेलुगूमध्ये 'मेस्ट्रो' आणि मल्याळममध्ये 'भ्रमम' म्हणून रिमेक करण्यात आला. 'बधाई हो' चा तामिळमध्ये 'वीताला विशेषमिन' म्हणून रिमेक तयार करण्यात आला आणि 'आर्टिकल 15' चा तामिळमध्ये 'नेन्जुक्कू नीधी' म्हणून रिमेक तयार करण्यात आला होता. दरम्यान आता या आयुष्माननं साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानं सांगितलं की, दक्षिण इंडस्ट्रीकडे जाणाऱ्या त्याच्या अनेक समवयस्कांप्रमाणे त्यालाही वेगळ्या भाषेत काम करायला हरकत नाही.

आयुष्मान खुरानानं केली इच्छा व्यक्त :आयुष्मान खुरानानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, साऊथकडे त्याच्या चित्रपटांचे रिमेक बनविलं जात आहे. रिमेक बनविणं हे चांगलं आहे, हे त्याला देखील मान्य आहे. आयुष्मान नेहमीच चांगली स्क्रिप्ट निवड करत असतो. त्यानं सांगितलं की, तो कधीही चांगली स्क्रिप्ट्स निवडण्याचं पाहतो, ज्यामुळे रूपेरी पडद्यावर गोंधळ उडेल. त्याला दुर्मिळ आणि नवीन विषययांवर काम करणं आवडतं. हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच साऊथ कंटेंटचे रिमेक बनविल्या जाते. साऊथ चित्रपटामध्ये खूप वेगळा विषय मांडल्या जात असते, त्यामुळे तो साऊथ चित्रपटसृष्टीचा खूप आदर करतो.

आयुष्मानला करायचं आहे यांच्यासोबत काम : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या यशानंतर अ‍ॅटली अनेकांचा आवडता दिग्दर्शक बनला आहे आणि अनेकांप्रमाणेच आयुष्मानही त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. आयुष्मानच्या बकेट लिस्टमध्ये आणखी एक अभिनेता आहे ज्याच्यासोबत त्याला काम करायला आवडेल. हा अभिनेता फहाद फासिल आहे. आयुष्माननं सांगितलं हा फहाद हा खूप वेगळा आहेत. त्यांची फिल्मोग्राफीही वेगळी आहे. आयुष्माननं 'ड्रीम गर्ल 2'द्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर हिट झाला आहे. या चित्रपटामध्ये आयुष्माननं खूप चांगला अभिनय केला आहे.

हेही वाचा :

  1. Kareena Kapoor Khan : करीना कपूर खाननं लग्न आणि मुलाच्या नावाच्या वादावर केला खुलासा...
  2. Jawan box office collection day 6 : शाहरुख खान आणि नयनताराचा 'जवान' बॉक्स ऑफिसवर करत आहे धमाल....
  3. Dharmendra Health : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी अमेरिकेला रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details