मुंबई - Brahmastra part 2 dev: अयान मुखर्जीनं शनिवारी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अभिनीत त्याच्या 2022 च्या ब्लॉकबस्टर 'ब्रह्मास्त्र'चा पहिला वर्धापन दिन साजरा केला आहे. ९ सप्टेंबर रोजी या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 'ब्रह्मास्त्र'ला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत दिग्दर्शक अयान मुखर्जीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये अयाननं लिहिलं, 'पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, ब्रह्मास्त्र. पुढं त्यानं लिहिलं, 'मी लवकरच ब्रह्मास्त्र यात्रेच्या पुढील भागाच्या काही गोष्टी शेअर करीन. याशिवाय त्यानं चित्रपटाशी संबंधित कलाकृतीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
अयान मुखर्जी लवकरच ' 'ब्रह्मास्त्र' पार्ट 2' घेऊन येणार :अयान मुखर्जीनं 2026 आणि 2027 मध्ये प्रदर्शित होणार्या दोन भागाची आधीच घोषणा केली आहे. 'ब्रह्मास्त्र पार्ट 1 - शिवा' चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय हे देखील कलाकार मुख्य भूमिकेत होते. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनद्वारे निर्मित, शाहरुख खान आणि नागार्जुन यांच्या विशेष उपस्थितीसह, जगभरातील बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई करणारा हा चित्रपट, कोविड-19 महामारीच्या काळात हिंदी चित्रपट उद्योगासाठी मोठ्या व्यावसायिक यशांपैकी एक होता. 'ब्रह्मास्त्र पार्ट 1' प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता अयान लवकरच 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' येऊन येणार आहे. चाहते 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' ची मागणी सातत्याने करत होते.