महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Gabriella Demetriades pregnancy : अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स दुसऱ्यांदा गर्भवती, फोटोंसह दिली बातमी - Gabriella Demetriades

अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने तिच्या सोशल मीडिया हँडलद्वारे तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. या जोडप्याला एरिक नावाचा मुलगाही आहे.

गॅब्रिएला डेमेट्रिएड्स दुसऱ्यांदा गर्भवती
गॅब्रिएला डेमेट्रिएड्स दुसऱ्यांदा गर्भवती

By

Published : Apr 29, 2023, 3:37 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड, मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने शनिवारी तिच्या दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा केली. मॉडेल गॅब्रिएलाने सोशल मीडिया हँडलवर तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील सुंदर फोटो शेअर केले. गॅब्रिएला फोटोमध्ये अत्यंत देखणी दिसत आहे. तिला तिच्या कपड्यांच्या ब्रँड डेमचा हलका तपकिरी पोशाख परिधान करुन ती तिचा बेबी बंप दाखवत आहे.

अर्जुन आणि गॅब्रिएलावर अभिनंदनाचा वर्षाव - फोटो शेअर होताच इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी कमेंट केश्नमध्ये भरपूर प्रतिसाद देत अभिनंदनाचा वर्षाव केला. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले, 'रामपाल कुटुंबाचे अभिनंदन'. दुसर्‍याने म्हटले, 'अभिनंदन गॅब्रिएला!! देव तुम्हाला आशीर्वाद देईल.' एमी जॅक्सन, काजल अग्रवाल, मलायका अरोरा, मौनी रॉय आणि दिव्या दत्ता यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी तिचे अभिनंदन केले आणि रेड हार्ट इमोजी टाकल्या. दरम्यान, अर्जुन रामपालने कमेंटमध्ये ह्रदयाचे इमोजी टाकले आहेत.

अर्जुन आणि गॅब्रिएला पाच वर्षापासून रिलेशनशिपमध्ये- गॅब्रिएला डेमेट्रिएड्स आणि अर्जुन रामपाल हे पाच वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये आहेत. ते आई-वडिल म्हणून त्यांचा मुलगा एरिकशी प्रेम देत आहेत.गॅब्रिएला डेमेट्रिएड्स ही सौंदर्यवती मॉडेल आहे. अनेक जाहिरीती आणि सिनेमातून तिने आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे. सोशल मीडियावर तिचे प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. अर्जुन रामपालला त्याची माजी पत्नी सुपरमॉडेल मेहर जेसिया हिच्यासोबत माहिका आणि मायरा ही दोन मुले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांची मुलगी मायरा हिने मुंबईतील डायरच्या फॅशन शोमधून रनवेमध्ये पदार्पण केले.

अर्जुन आणि गॅब्रिएला एकाच तित्रपटात झळकणार - कामाच्या आघाडीवर, गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने सोनाली केबल या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. लवकरच, गॅब्रिएला आणि अर्जुन दोघेही एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. गॅब्रिएला एका ब्रिटिश-भारतीय पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, जी अर्जुनच्या चारित्र्याची चौकशी करत असते. त्याच्या व्यक्तिरेखेचा तिच्यावर क्रश आहे, त्यामुळे चित्रपटात त्यांच्यात एक रोमँटिक अँगल देखील असणार आहे.

हेही वाचा -Ponniyin Selvan 2 Box Office Collection: मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन 2 ची पहिल्या दिवशी दमदार कमाई

ABOUT THE AUTHOR

...view details