मुंबई - अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलिवूडचे नवे लव्हबर्ड्स आहेत. दोघांनी आता जाहीरपणे त्यांच्या प्रेमावर शिक्कामोर्तब केले आहे. आधी हे जोडपे गुपचूप एकमेकांच्या पोस्ट पाहायचे, परंतु सोशल मीडियावर कधीही एकत्र फोटो शेअर केले नाहीत. आता दोघेही एकमेकांचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सजवत आहेत. अलीकडेच या जोडप्याने अर्जुनचा पॅरिसमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. या जोडप्याने सोशल मीडियावर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत. आता अर्जुनने त्याच्या लेडी लव्हसोबतचा आणखी एक फोटो शेअर केला आहे.
अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतचा सेल्फी शेअर केला आहे. फोटो शेअर करताना 'अ सेल्फी विथ द शॉपहोलिक' असे लिहिले आहे. फोटोमध्ये मलायका-अर्जुनच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर दोघेही एकदम मस्त आणि स्टायलिश क्लासी लूकमध्ये दिसत आहेत. काळ्या पँट आणि निळ्या टी-शर्टमध्ये अर्जुन मस्त दिसत आहे, तर मलायका हिरव्या रंगाच्या ब्लेझर आणि शॉर्ट्समध्ये कहर करत आहे.