महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Cannes 2023 : अनुष्का शर्माने रेड कार्पेटवर केले पदार्पण - विराट कोहली

अनुष्का शर्माने शुक्रवारी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्लॅमरस क्रीम रंगाच्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर पदार्पण केले. फ्रेंच रिव्हिएरा येथील पदार्पण केल्याचे फोटो शेअर केल्यावर विराट कोहलीने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

Anushka Sharma
अनुष्का शर्मा

By

Published : May 27, 2023, 2:58 PM IST

मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने शुक्रवारी 76व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर पदार्पण केले. यावेळी अनुष्का क्रीम रंगाच्या गाऊन परिधान केला होता. ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये ती फार देखणी दिसत होती. त्यामुळे प्रत्येकाच्या नजरा हे अनुष्काकडे जात होत्या. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोत ती जबरदस्त दिसत असून तिच्या या लुकमुळे सोशल मीडियावर तिच्यावर प्रेमाचा वर्षा होतांना दिसत आहे. अनुष्काचा हा गाऊन हा ऑफ-शोल्डर आयव्हरी रिचर्ड क्विन कॉचर होता शिवाय यावर इन-हाऊस एटेलियर आणि आयव्हरी सिल्क टफेटा गुलाबचे भरतकाम केले होते. तिने जियानविटो रॉसीच्या हिल्ससह ,चोपार्डच्या पिवळ्या आणि पांढर्‍या डायमंड रिंग व डायमंड ड्रॉप इअररिंग घातले होते. याशिवाय तिने स्लीक हेअर बन घातला होता. क्लीन मेकअप लूकसह अनुष्काने तिचा लूक पूर्ण केला होता.

अनुष्का शर्मा

अनुष्काच्या पोस्टवर प्रतिक्रिया : फ्रेंच रिव्हिएरा येथील पदार्पण केल्याचे फोटो शेअर केल्यावर विराट कोहलीने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. बाकी भारतीय क्रिकेटरने अनुष्काच्या पोस्टवरील कमेंटमध्ये हार्ट आणि इमोजी टाकले. आलिया भट्टने देखील अनुष्काच्या डेब्यू लूकवर कमेंट केली आणि हृदयाच्या इमोजीसह 'तुम्ही आश्चर्यकारक आहात' असे लिहिले. तसेच प्रीती झिंटा आणि झोया अख्तर यांनी रेड हार्ट इमोजी टाकले आहे.

अनुष्का शर्मा

कान्स 2023 मध्ये अनुष्का : सिनेमातील महिलांना सन्मानित करण्यासाठी अनुष्का कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये उपस्थित होती. अनुष्का आणि विराटने अलीकडेच भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनिन यांची नवी दिल्लीतील फ्रेंच दूतावासमध्ये भेट घेतली. भारतातील फ्रेंच राजदूत इमॅन्युएल लेनिन यांनी एका ट्विटमध्ये ती चित्रपट महोत्सवात असल्याचे उघड केले. 'विराट कोहली आणि अनुष्का शर्माला भेटून आनंद झाला! मी विराट आणि टीम इंडियाला आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आणि अनुष्काच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या प्रवासाबद्दल मी चर्चा केली,' असे त्यांनी नवी दिल्लीतील फ्रेंच दूतावासात अनुष्का आणि विराटची भेट घेतल्यानंतर लिहिले आहे. अनुष्का व्यतिरिक्त, सारा अली खान आणि मृणाल ठाकूर यांनी या वर्षी प्रतिष्ठित व्यासपीठावर पदार्पण केले. शिवाय ऐश्वर्या राय आणि सनी लिओन यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.

अनुष्का शर्मा

अनुष्काचा आगामी चित्रपट : अनुष्का ही तिच्या आगामी स्पोर्ट्स बायोपिक चित्रपट चकडा एक्सप्रेसमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट भारताची माजी क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित आहे. प्रोसिट रॉय दिग्दर्शित हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या अंतिम प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. अनुष्काचा भाऊ कर्णेश शर्मा त्याची होम प्रोडक्शन कंपनी क्लीन स्लेट फिल्म्झसोबत चकडा एक्सप्रेसची निर्मिती करणार आहे. शाहरुख खान आणि कतरिना कैफ सोबत 2018 मध्ये तिच्या शेवटच्या रिलीज झालेल्या झिरोनंतर कुठेही झळकली नाही त्यामुळे ती लवकरच चकडा एक्सप्रेसम प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.

हेही वाचा :What a coincidence : अनुष्का शर्मा आणि क्रिती सेनॉन एकाच दिवशी झळकल्या रिचर्ड क्विन गाऊनमध्ये

ABOUT THE AUTHOR

...view details