महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ICC World Test Championship Final 2023 : विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का शर्मा सोशल मीडियावर ट्रोल - वामिका कोहली

आयसीसी २०२३ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव झाला. विराट कोहली अवघ्या ४९ धावांवर बाद झाल्याने चाहत्यांनी अनुष्काला दोष ठरवत तिला ट्रोल करण्यात आले.

Anushka Sharma and Virat Kohli
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

By

Published : Jun 12, 2023, 1:45 PM IST

मुंबई :आयसीसी २०२३ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या सामन्यात, विराट कोहली अवघ्या ४९ धावांवर बाद झाल्याने चाहत्यांना फार वाईट वाटले, विराट बाद झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. विराट पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या पतीला पाठिंबा देण्यासाठी हा सामना बघायला आली होती. मात्र हा सामाना हारल्यानंतर अनुष्का सोशल मीडियावर फार ट्रोल केल्या जात आहे. ट्विटरवर, संतप्त चाहत्यांनी तिची निंदा करत तिची खरटपट्टी काढली आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साइटला अपमानास्पद कमेंटचा आता पूर आला आहे. अनुष्काच्या चाहत्यांनी मात्र तिचा पती किंवा भारतीय संघ चांगला खेळला नाही ही तिची चूक नाही असे सांगत तिच्या बचावात उतरले आहे.

अनुष्काला केले ट्रोल : अनुष्काला ट्रोल करण्यात नवशिक्या नाही कारण जेव्हाही विराट मैदानावर वाईट कामगिरी करतो तेव्हा तिला सोशल मीडियाच्या रोषाचा सामना करावा लागतो. यापूर्वीही विराटने आपल्या पत्नीला ऑनलाइन गैरवर्तनापासून दोन वेळा वाचवले होते. चाहत्यांना त्याच्या अपयशाचे श्रेय अनुष्काला देऊ नका अशी विनंती करूनही, तिला ट्रोल करण्यात आले होते.

प्रेमकहाणी : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 2013 मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर दोघांनी एकामेंकाना डेटिंग करण्यास सुरू केले. या जोडप्याने आपले नाते त्यांच्या चाहत्यांपासून आणि लोकांपासून बराच काळ गुप्त ठेवले होते. काही वर्षांच्या डेटिंगनंतर या जोडप्याने 2017 मध्ये इटलीमध्ये एका इंटिमेट सेरेमनीमध्ये लग्न केले. 11 जानेवारी 2021 रोजी अनुष्का आणि विराटला मुली वामिका झाली. या जोडप्याने बऱ्याच दिवस आपल्या मुलीचा चेहरा हा चाहत्यांना दाखविला नव्हता. अनुष्का अनेकदा वामिका घेवून क्रिक्रेट सामना बघायला जाते. शिवाय विराट आणि अनुष्का यापुर्वी आपल्या मुलीला घेवून बाबा नीम करोलीच्या आश्रममध्ये देखील गेले होते. यावेळी अनुष्का ही वामिकाला मांडेवर घेवून बसली होती. यानंतर आश्रममध्ये वामिकाच्या गळ्यात एक हार देखील यावेळी घालण्यात आला होता. विराट आणि अनुष्का बाबा नीम करोली कट्टर अनुयायी आहेत.

हेही वाचा :

  1. Madhu Mantena Wedding : मसाबा गुप्ताचा पूर्व पती मधु मंटेना इरा त्रिवेदीसोबत पुन्हा चढला बोहल्यावर
  2. खास मराठी प्रेक्षकांसाठी बहुभाषिक ‘1 ओटीटी’ च्या मराठी प्रभागाचा शुभारंभ, स्वप्नील जोशी असेल 'ब्रँड फेस'!
  3. Rubina Dilaik Car Accident: बिग बॉस फेम रुबिनाच्या कारचा अपघात; ट्विट करून दिले हेल्थ अपडेट

ABOUT THE AUTHOR

...view details