मुंबई :अनुष्का शर्मा आणि तिच्या बॉडीगार्डचे दुचाकी चालवताना हेल्मेट न घालता फोटो व्हायरल झाले आहे. फोटो व्हायरल होताचं काही दिवसांनंतर, मुंबई वाहतूक पोलिसांनी अनुष्का शर्माच्या विरोधात चालान जारी केले. बॉडीगार्ड सोनू शेखने हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याबद्दल आणि परवान्याशिवाय वाहन चालवल्याबद्दल 10,500 रुपयांचा दंड ठोकविण्यात आला आहे. याप्रकरणाचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यावर, अनेक नेटकऱ्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. शिवाय अनेकांनी तिचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोलिसांना टॅग करून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बाईकने जाणे पडले महागात : बुधवारी , मुंबई वाहतूक पोलिसांनी तक्रारीचे फोटो ट्विट केले आणि लिहिले की, 'कलम 129/194(D), कलम 5/180 आणि कलम 3(1)181 MV कायद्यानुसार चालकाला 10,500 रु.च्या दंडासह चलन जारी करण्यात आले आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, अनुष्का शर्माला सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल केल्या जात आहे. अनुष्काला शूटसाठी वेळेवर पोहचता यावे म्हणून तिने बाईकचा पर्याय निवडला होता. तिने चुकीचे काम केले त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. यापुर्वी अनुष्का शर्मा व्यतिरिक्त अमिताभ बच्चनवर ही हेल्मेट न घातल्याबद्दलची टीका झाली आहे. अमिताभ बच्चन नुकतेच वाहतूक पोलिसांचे नियम मोडल्याने अडचणीत आले आहेत.एकीकडे हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्याबद्दल दोन्ही स्टार्सना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी वाहतूक पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी हेल्मेट न घातल्याप्रकरणी दोन्ही कलाकारांवर कडक कारवाई केली आहे. याबाबत माहिती देताना स्वत: वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एजन्सीला सांगितले की, स्वाराला दंड ठोठावण्यात आला आहे.