मुंबई - अनुराग कश्यपने अभिनेत्री सनी लिओनच्या केनेडीमधील भूमिकेबद्दल आणि चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरसाठी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या पदार्पणाबद्दल भाष्य केले आहे. या चित्रपटाच्या नाईट प्रीमियरला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. एका मुलाखतीत अनुरागने या चित्रपटातील चार्लीच्या भूमिकेसाठी सनी लिओनची निवड का केली हे सांगितले. केनेडीमधील सनीच्या व्यक्तिरेखेबद्दल फारसे काही समोर आलेले नाही आणि टीझरमध्येही तिची फक्त एक छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. लिफ्टमध्ये प्रवेश केल्यानंतर ती हशा पिकवताना टिझरमध्ये दिसत आहे. हा चित्रपट एका निद्रानाश झालेल्या माजी पोलिसावर केंद्रित आहे, जो मृत असल्याचे गृहीत धरले जाते परंतु तो यातून सुटका शोधत आहे.
सनी लिओनची केनेडीसाठी का झाली निवड? - कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अनुराग कश्यप म्हणाला, 'मी शपथेवर सांगतो की मी सनी लिओनचे चित्रपट कधीच पाहिलेले नाहीत. तिने घेतलेल्या मुलाखती मी पाहिल्या आहेत. तिच्या डोळ्यात एक निश्चित दुःख आहे. तिचे एक पूर्वायुष्य आहे. मला एका चाळीसीतील अशा महिला कलाकाराचा शोध होता की तिच्या आजूबाजूला असणाऱ्या ५० - ६० वयाच्या पुरुषांकडून तिचे लैंगिक शोषण केले आहे. मला असा प्रकारच्या लैंगिक क्रिया किंवा असे काहीही पाहण्याची गरज नाही. मला अशा महिलेची गरज होती की ती महिला अशा लोकांशी कशी व्यवहार करते, हाताळते आणि नेव्हिगेट करण्यासाठी सर्वकाही करते. मला सनीमध्ये ती एक स्त्री सापडली जिच्याकडे हे सर्व गुण आधीच आहेत.'