महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Anupam kher : अनुपम खेर यांनी केली सतीश कौशिक यांच्या आठवणीत भावनिक पोस्ट... - फोटो शेअर केले

अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे मित्र सतिश कौशिक यांची आठवण काढत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर अनेक चाहते खेर यांचे कौतुक करत आहेत.

Anupam kher
अनुपम खेर

By

Published : Aug 6, 2023, 5:22 PM IST

मुंबई :अभिनेते अनुपम खेर सध्या त्यांच्या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी त्यांच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये ते रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेत दिसणार आहे. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने टीव्हीपासून फिल्म इंडस्ट्रीपर्यंतचे सर्व स्टार्स आपल्या मित्रांसाठी सोशल मीडियावर काहीतरी खास पोस्ट करत आहेत. दुसरीकडे, अनुपम खेर यांनी फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने त्यांच्या इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली. ही पोस्ट खूप भावनिक आहे. अनुपम खेर यांनी त्याचा दिवंगत मित्र सतीश कौशिक यांच्या स्मरणार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

अनुपम खेर यांनी पोस्टवर लिहिले : फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अनुपम खेर यांनी त्यांचा जिवलग मित्र सतीश कौशिक यांची आठवण काढली. अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या पहिल्या फोटोत अनुपम खेर आणि अनिल कपूर एकत्र दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये सतीश कौशिक अनुपम खेर आणि अनिल कपूरसोबत दिसत आहेत. या पोस्टसोबत अनुपम खेर यांनी लिहिले- 'हॅप्पी फ्रेंडशिप डे, 'आज माझ्या मला तुझी खूप आठवण येत आहे. सतीश 'असे त्यांनी पोस्टमध्ये लिहले.

चाहते देत आहेत प्रतिक्रिया : अनुपम खेरची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत. या फोटोवर एका यूजरने लिहिले की, 'आजकाल असे मित्र कुठे मिळतात आणि अनुपम सर हे एकमेव आहेत ज्यांना त्यांच्या मित्राची त्यांच्या जाण्यानंतरही खूप आठवण येते.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'तुम्हा तिघांची मैत्री पाहून डोळे ओलावले.' अनुपम खेर, सतीश कौशिक आणि अनिल कपूर हे इतके चांगले मित्र आहेत की लोक त्यांच्या मैत्रीची उदाहरणे देतात, कारण अनेक चित्रपटांमध्ये या तिघांनी काम केले आहेत.

अनुपम वंशिकाची काळजी घेत आहेत : सतीश यांचे निधन झाल्यापासून अनुपम खेर त्यांची मुलगी वंशिकाची काळजी घेत आहेत. या वर्षी ९ मार्च रोजी सतीश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनुपम खेर आणि अनिल कपूर हे दोघेही सतीशचे जवळचे मित्र आहेत. तिघांनीही 'राम लखन' चित्रपटात एकत्र काम केले होते. याशिवाय 'मिस्टर इंडिया' या चित्रपटात सतीश कौशिक यांनी अनिल कपूरसोबत काम केले होते.

हेही वाचा :

  1. National Sisters Day 2023 : राष्ट्रीय भगिनी दिवसानिमित्त आपल्या बहिणीसह पाहा 'हे' सर्वोत्कृष्ट बॉलीवूड चित्रपट...
  2. RRKPK Collection Day 9 : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने घेतली ९व्या दिवशी मोठी झेप...
  3. Lappu Sa Sachin Song : सीमा-सचिनच्या प्रेमकथेवर तयार केले गाणे झाले व्हायरल...

ABOUT THE AUTHOR

...view details