महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

देशभरात सर्वत्र 'अ‍ॅनिमल' मॅनिया, चाहत्यांनी ठरवलं ब्लॉकबस्टर

Animal X reviews : रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारत असलेला संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' अखेर चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. हा चित्रपट पाहून अनेक युजर्सनी चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिलाय.

Animal X reviews
देशभरात सर्वत्र 'अ‍ॅनिमल' मॅनिया

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 11:12 AM IST

मुंबई- Animal X reviews : रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा बहुप्रतिक्षित रिव्हेंज ड्रामा चित्रपट 'अ‍ॅनिमल' अखेर चित्रपटगृहात दाखल झाला आहे. हा चित्रपट अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता. रणबीरचे निष्ठावंत चाहते याच्या रिलीजची वाट पाहात होते. अपेक्षेनुसार, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांनी दिलाय. X वर अनेकांनी चित्रपट पाहिल्यानंतर सकारात्मक रिव्ह्यू दिला आहे. अनेकांनी हा चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचं घोषित केले आहे.

ही कथा वडील आणि मुलामधील तणावपूर्ण नात्याभोवती फिरते. यात मुलगा वडिलांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेल्या लोकांना धडा शिकवताना दिसतो. प्रेक्षकांनी या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पहाटेचे शोदेखील पूर्ण खचाखच भरले होते. जर तुम्‍ही चित्रपटगृहात जाऊन 'अ‍ॅनिमल' पाहण्‍याचा विचार करत असाल तर प्रेक्षकांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा.

बॉलीवूडचे व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते हा चित्रपट प्रचंड ब्लॉकबस्टर आहे. त्यांनी X वर लिहिले: "चित्रपट 'अ‍ॅनिमल' एका फॅटाब्युलस नोटवर सुरू होतो... शहरी केंद्रांपासून ते देशभराच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मल्टिप्लेक्सपासून सिंगल स्क्रीनपर्यंत, पूर्वेकडून पश्चिम आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे सर्वत्र 'अ‍ॅनिमल' मॅनिया आहे... रणबीर कपूरचा हा चित्रपट सर्वात जबरदस्त सलामीवीर बनला आहे."

एका सोशल मीडिया युजरनं चित्रपटाची प्रशंसा करताना लिहिले : "संदीप वंगा कडून आणखी एक मास्टर पीस. रणबीर वॉज जस्ट लिट." हा चित्रपट अप्रतिम आहे. ब्लडी हेल - 500Kg मशीन गन सीन. सोशल मीडियावर सकारात्मक कमेंट्सचा वर्षाव झालेला असला तरी काहींना चित्रपटाची लांबी थोडी चिंताजनक वाटली आहे.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा रनटाइम तीन तासांपेक्षा जास्त आहे आणि चित्रपटाच्या दीर्घ कालावधीबद्दल विचारले असता रणबीर कपूर म्हणाला होता की, "आम्ही इतका लांब चित्रपट प्रदर्शित करत आहोत, तो गर्विष्ठपणामुळे नाही तर आम्हाला विश्वास आहे की कथेला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतका वेळ लागतो आहे. आम्ही या चित्रपटाची ३ तास ४९ मिनिटांची आवृत्तीही पाहिली आहे आणि ती आवृत्तीही मनोरंजक होती."

तो पुढे म्हणाला, "संदीपनं लांबी कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आम्हाला आशा आहे की प्रेक्षक या चित्रपटाच्या लांबीमुळे कंटाळणार नाहीत आणि सिनेमाच्या अनुभवाचा पुरेपूर आनंद घेतील."

Also read:

1. अंकिता लोखंडेनं मुनावर फारुकीपासून स्वतःला केलं दूर, तर खानजादीला सोडायचा आहे शो

2.'अ‍ॅनिमल'च्या स्क्रिनिंगला रणबीरचा टी शर्ट घातलेल्या आलियाच्या उपस्थितीनं वेधलं सर्वांचं लक्ष

3.उर्वशी रौतेलाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details