महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Chunky pandey birthday : अनन्या पांडेनं 'हे' फोटो आणि व्हिडिओ शेअर करून वडील चंकी पांडेला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा... - चंकी पांडेचा वाढदिवस

Chunky pandey birthday : चंकी पांडे आज आपला 61वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याला मुलगी अनन्या पांडेनं काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Chunky pandey birthday
चंकी पांडेचा वाढदिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 10:58 AM IST

मुंबई -chunky pandey birthday : बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेला आज 26 सप्टेंबरला आपला 61वा वाढदिवस साजरा करत आहे. चंकी पांडेचं खर नाव हे सुयश पांडे आहे. तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत चंकी पांडेनं अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहेत. चंकीनं अनेक चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आणि सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत, यामुळं त्याला खूप लोकप्रियता मिळाली. दरम्यान आता या खास प्रसंगी त्याचे चाहते आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्याला शुभेच्छा देत आहेत.

चंकी पांडेचा वाढदिवस

अनन्या पांडेनं वडील चंकी पांडेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या :अनन्या पांडे ही बर्‍याचदा तिच्या वडिलांसोबत वेळ घालवताना दिसते. दरम्यान आता तिनं या खास प्रसंगी आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनन्यानं इन्स्टाग्राम स्टोरीजवर काही मजेदार फोटो आणि व्हिडिओ शेअर करून वडिलांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनन्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट केलेला पहिल्या व्हिडिओत ती आपल्या वडिलांसोबत मजा करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये चंकी हा छोट्या अनन्याला 'बेबी पापी' म्हणायला शिकवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत तिनं लिहलं, एवढ्या लहान वयात कॅमेऱ्याशी माझी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छा पापापती. तुझ्यावर प्रेम आहे.'

चंकी पांडेचा वाढदिवस

अनन्यानं न पाहिलेले फोटो केले शेअर :अनन्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये चंकी अनन्याला मिठी मारताना दिसत आहे. यानंतरच्या फोटोमध्ये तो जेवणाच्या टेबलावर बसलेले दिसत आहेत. त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये तो निळ्या रंगाचा चेहऱ्यावर फेस पॅक लावून बसलेला आहे. यावर त्यानं एक हेअरबँड घातलेला आहे. तसेच तिसऱ्या फोटोमध्ये अनन्याची आई भावना पांडे आणि धाकटी बहीण रियासा यांच्यासोबतचा कौटुंबिकमध्ये फोटो आहे. यानंतर चौथ्या फोटोमध्ये चंकीनं काउबॉय टोपी घातली आहे. शेवटच्या फोटोमध्ये तो आपल्या पत्नी भावनासह दिसत आहे. अनन्यानं शेअर केलेले फोटो खूप खास आहे.

चंकी पांडेचा वाढदिवस
चंकी पांडेचा वाढदिवस

अनन्या पांडे वर्क फ्रंट : अनन्या पांडेनं 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2' आणि 'पती पत्नी और वो' सारख्या चित्रपटांमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर आता तिचा नुकताच 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट आयुष्मान खुरानासोबत आला आहे. याशिवाय ती 'खो गये हम कहाँ', 'कंट्रोल' आणि 'शंकारा' या चित्रपटात दिसणार आहे.

चंकी पांडेचा वाढदिवस
चंकी पांडेचा वाढदिवस

हेही वाचा :

  1. Farrey teaser Out : बॉलीवूडमध्ये आणखी स्टार कीडचे पदार्पण, सलमान खानची निर्मिती असलेल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
  2. Who's Your Gynac? trailer Out : 'हू इज युअर गायनॅक?' वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज; पाहा व्हिडिओ...
  3. Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकपणे दिसले एकत्र...

ABOUT THE AUTHOR

...view details