मुंबई - शाहरुख खानचा पठाण चित्रपट जगभर गाजत असताना त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी करणारे थंड पडले आहेत. असे असले तरी काही जण पठाणवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. अशातच आयुष्मान खुराणाचा अॅन अॅक्शन हिरो हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय आणि आयुष्मानच्या चाहत्यांना तो आवडला आहे, याबद्दल कोणतीच शंका असण्याचे कारण नाही. परंतु एका चाहत्याने पठाण पेक्षा अॅन अॅक्शन हिरो कसा ग्रेट आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण आयुष्मानने चाहत्याला शांत बसायला सांगत, आपणही शाहरुखचे फॅन असल्याचे सांगितले.
आयुष्मानची चाहती असेल्या मुबिना कापसीने ट्विट करत लिहिले की, 'स्क्रू पठाण, नेटफ्लिक्सवर अॅक्शन हिरो पहा! कथा, संवाद, पार्श्वसंगीत, भारतीय वृत्तवाहिन्यांना दाखवले जाणारे सूक्ष्म मधले बोट आणि त्यांचे चुकीचे रिपोर्टिंग, आयुष्मानने तर जबरदस्त मारले आहे. ! पण अर्णबची नक्कल करणारा माणूस माझा आवडता होता'
कमेंट वाचून आयुष्मानला व्यक्त होणे राहावले नाही. त्याने तातडीने याला उत्तर दिले आणि लिहिले की, ' अॅक्शन हिरोवर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. 😎पहिली ओळ टाळता आली असती तरीही मी SRKian आहे!''विनोदाच्या ऑफबीट व्यंग्यात्मक भावनेसह हा एक वेगवान अॅक्शनर अॅन अॅक्शन हिरो हा चित्रपट म्हणून ओळखला जाईल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती. कथानक चांगले असूनही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरपर्यंत पोहोचू शकले नाहीत.