महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'चीनी कम फेम' स्विनी खाराच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल - स्विनी खाराचं लग्न

Swini Khara wedding pictures out : अभिनेता अमिताभ बच्चन अभिनीत 'चीनी कम' या चित्रपटामधील बालकलाकार स्विनी खाराचं लग्न 26 डिसेंबर रोजी बॉयफ्रेंड उर्विश देसाईसोबत झालं. या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Swini Khara wedding pictures out
स्विनी खारा लग्नाचे फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 5:08 PM IST

मुंबई - Swini Khara wedding pictures out : अभिनेता अमिताभ बच्चन स्टारर 'चीनी कम'ची बालकलाकार स्विनी खाराचं लग्न झाले आहे. स्विनी खारानं 26 डिसेंबर रोजी तिचा बॉयफ्रेंड उर्विश देसाईसोबत राजस्थानमधील जयपूर येथे सात फेरे घेतले आहे. 25 वर्षीय स्विनीनं तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. स्विनीनं तिच्या लग्नात सुंदर आणि क्लासिक रेड कलरचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यात ती खूप सुंदर दिसत होती. 'चीनी कम' या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत तिनं सुंदर कामगिरी केली होती.

'चीनी कम' फेम स्विनी खाराच्या लग्नातील फोटो व्हायरल :स्विनीनं काल रात्री तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नाचे फोटो शेअर पोस्ट लिहिलं, ''प्रेम सापडलं आणि भावपूर्ण आरसाही, हा खास दिवस कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळाला आहे''. तिच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करत तिला शुभेच्छा देत आहेत. एका यूजरनं फोटोवर कमेंट करत लिहिलं, ''स्विनी तुझे फोटो खूप खास आहे, तुला खूप खूप शुभेच्छा''. दुसऱ्या एकानं लिहिलं, ''खूप खूप अभिनंदन''. आणखी एकानं लिहिलं, ''दोघांची जोडी सुंदर आहे''. अशा अनेक कमेंट या फोटोंवर सध्या येत आहेत. याशिवाय काहीजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. यापूर्वी, स्विनीनं तिच्या लग्नातील मेहंदी, हळदी आणि संगीत उत्सवांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते.

स्विनी खारानं केलं 'या' चित्रपटामध्ये काम : स्विनीनं लग्नाआधी पतीसोबत एक अप्रतिम फोटो सेशनही केलं होतं. या चालू वर्षातच स्विनी खारानं तिच्या बॉयफ्रेंडसोबत एंगेजमेंट केली होती. अमिताभ बच्चन यांच्या 'चिनी कम' या चित्रपटासोबतच स्विनीनं 'जिंदगी खट्टी-मीठी', 'दिल मिल गए' आणि सुशांत सिंग राजपूत स्टारर चित्रपट 'एमएस धोनी - अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटामध्ये काम केलं आहे. याशिवाय ती अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे.

हेही वाचा :

  1. बॉक्स ऑफिसवर 'डंकी' चित्रपटाच्या कमाईत घसरण
  2. 'सालार'नं सात दिवसात 500 कोटीच्या क्लबमध्ये केला प्रवेश
  3. बॉक्स ऑफिसवर 'डंकी' चित्रपटाच्या कमाईत घसरण

ABOUT THE AUTHOR

...view details