मुंबई - Rashmika Mandanna Fake Viral Video: साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. तिनं 'गुडबाय' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दरम्यान ती आता चर्चेत आली आहे. रश्मिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे. या व्हिडिओविषयी सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. एआयच्या डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीनं हा बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. रश्मिकाचा व्हिडिओ इतका खरा वाटत आहे की, एकदा पाहिल्यानंतर कोणीही विश्वास ठेवेल, खरंच तिचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिका मंदान्ना ही काळ्या रंगाच्या डीपनेक जंपसूटमध्ये दिसत आहे. ती लिफ्टच्या दरवाजातून बाहेर येत आहे. दरम्यान खरा व्हिडिओ एक्स हँडलवर समोर आला आहे. खरा व्हिडिओ समोर आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी तो व्हिडिओ शेअर करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
रश्मिका मंदान्नाचा व्हिडिओ व्हायरल :सध्या रश्मिकाचे चाहते या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींना तिची बोल्ड स्टाइल आवडली आहे, तर काहीजण तिला ट्रोल केलं आहे. हा व्हिडीओ रश्मिकाचा नसून फेक व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी रश्मिका मंदान्ना नसून हा डीपफेक एडिट केलेला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ झारा पटेल नावाच्या मुलीचा आहे. झारानं व्हिडिओ 9 ऑक्टोबर 2023 रोजी इंस्टाग्रामवर शेअर केला होता. झाराचे इन्स्टावर 418 हजार फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिचे हॉट व्हिडिओ शेअर करत असते. व्हिडिओच्या सुरुवातीला नॅनो सेकंदांमध्ये चेहराही बदलताना दिसत आहे. रश्मिकाचा हा व्हिडिओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिचा हा व्हिडिओ खरा नसून तो खोटा व्हिडिओ आहे, मात्र सोशल मीडिया यूजर्सनं याबद्दल आता चिंता व्यक्त केली आहे.