महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Alia Bhatt Wish Neetu Kapoor: आलिया भट्टने सासू नीतू कपूरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; पोस्ट पहाच जरा - Alia Bhatt Wishes Neetu Kapoor

आलिया भट्टने तिची सासू नीत कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा ( Alia Bhatt Wish Neetu Kapoor ) एक अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय फोटो शेअर केला आहे. ज्यात दोघींनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहेत.

Alia bhatt
आलिया भट्ट

By

Published : Jul 8, 2022, 11:17 AM IST

हैदराबाद - रणबीर कपूर आणि आलिया भट ( Ranbir Kapoor and Alia Bhatt ) यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. एककीडे ते दोघेही लवकच आई-बाबा होणार ( parents to be ) आहेत तर दुसरकडे आज आलिया भट्टची सासू आणि रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांचा आज वाढदिवस आहे.

आलिया भट्ट

सासू नीतू कपूर यांच्या वाढदिवसाबद्दल मॉम टू बी आलिया भट्टने तिच्या सासूबाईंना खास शैलीत शुभेच्छा दिल्या ( Alia Bhatt Wish Neetu Kapoor ) आहेत. आलिया भट्टने तिच्या हळदी समारंभाचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये नीतू कपूर आलियाच्या कपाळाचे चुंबन घेताना आणि तिला आशीर्वाद देताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत आलियाने लिहिले की, “सुंदर व्यक्तीमत्तवाला आणि माझी सासू, मैत्रिण आणि लवकरच होणार्‍या आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. असे कॅपश्न आलिया भट हिने दिले आहे..

आलिया भट्टने यावर्षी 14 एप्रिल रोजी बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणबीर ( Alia Bhatt And Boyfriend Ranbir Kapoor ) कपूरसोबत लग्न केले ( married on 14 April ) . लग्नाच्या अडीच महिन्यांनंतर या जोडप्याने आपल्या चाहत्यांना मोठी गोड बातमी ( Alia Bhut Is Pregnant ) दिली आहे. ते लवकरच खऱ्या आयुष्यात आई-वडील होणार आहेत. आलिया आणि रणबीर दोघेही त्यांच्या पहिल्या बाळाबद्दल खूप आनंदी दिसत आहेत.

त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच ब्रह्मास्त्र या चित्रपटात ( Brahmastra Movie ) एकत्र दिसणार आहेत. ९ सप्टेंबरला हा चित्रपट पर्रदर्शित होईल. त्याआधी रणबीर कपूरची शमशेरा मूवी 22 जुलैला ची प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे रणबीर कपूर सध्या शमशेरा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ( Shamsheras promotion ) व्यस्त आहे.

हेही वाचा -श्रद्धा कपूरने भाऊ सिद्धांत कपूरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details