मुंबई- ब्रह्मास्त्र चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या खूप आनंदी आहेत. दरम्यान, हे विवाहित जोडपे चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही व्यग्र आहे. अशा परिस्थितीत या जोडप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे हे जोडपे पुन्हा एकदा लोकांच्या नजरेत आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, आलिया भट्ट रणबीरच्या केस सावरण्यासाठी हौशी फोटोग्राफर्स समोर हात पुढे करते आणि आलिया केस सावरणार इतक्यात रणबीर आपले डोके मागे वळवतो. आलियाला असे करण्यापासून तो थांबवतो.
या व्हिडिओमध्ये आलियाने फाटलेल्या जीन्सवर पिवळा शर्ट तर रणबीरने निळ्या जीन्सवर पांढरा टी शर्ट घातला आहे. ही जोडी दिसायला सुंदर आहे, पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता यूजर्स आपलं काम करायला लागले आहेत.